शुक्रवार, २८ नोव्हेंबर, २०१४

हरवलेलं बालपण …………?

मायेचा गोडवा प्रेम व्यक्त करत जातं 
ती चिमुकली मात्र त्या गोडव्यात व्यक्त होत जाते 
या गोडव्याचे बंध स्वप्नांमध्ये रुतलेले असतात 
हे बंध जपताना भीती त्या चिमुकलीच्या जगण्याचा वेध घेत असते……. ? 
     जगण्यातल्या त्या पहिल्या टप्प्याकडे पाहताना अनुभव आणि भीती या दोनही गोष्टी आपल्या बरोबर असतात पण धैर्य गाठायला भयासोबत माउलीच्या या मायेच्या गोडव्याने आत्मविश्वास , बळ , आणि प्रेम या तीन गोष्टींच कुंपण त्या चिमुकलीच्या हृदयाभोवती घातलेलं असतं.  
माऊलीनं जन्म दिला 
अन त्या जगण्यातला गोडवा हळूहळू त्या इवल्याश्या चिमुकलीला कळू लागला 
या गोडव्यानं त्या चिमुकलीला नवनवीन अर्थ सापडू लागले 
आणि ती चिमुकली ते अर्थ दिवसागणिक शोधू लागली 
माऊलीच्या मायेच्या गोडव्यानं तिला अर्थागणीक भावार्थही उमगू लागले 
अनुभव , आठवणी , आणि प्रेमाचे बंध त्या चिमुकलीला कळू लागले. 
भ्याडपणा समोर असताना जगायचं कसं , जगणं फुलवायचं कसं याचे भाव तिला मायेच्या या गोडव्यानं स्पर्शून जाऊ लागले…………… !
     हे सांगण्याचा उद्देश असा कि धकाधकीच्या जीवनात माणूस स्वतःला वेळच देत नाही. त्या माऊलीच्या मायेच्या गोडव्याच स्मरण करणंच हरवून गेलाय जन्माला आल्यावर आपलं नातं माउलीच्या जगण्याने वेढलेलं आणि जोडलेलं असतं. पण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला असता आपल्या लक्षात येईल कि मानवाच्या या धकाधकीच्या जगण्यातलं पाहिलं नातं सध्या वेळेशी जोडलं गेलंय. घड्याळाच्या काट्यावर मिनिटामिनिटाला त्याची दैनंदिनी बदलत असते. 
    पण एकंदरीतच अशा जगण्याचा विचार करत असता असे दिसून येते कि किती भयाण परिस्थिती निर्माण झाली आहे .
आता बघा नं त्या चीमुकालीसारखे अनेक जीव जन्माला येतात , आणि अनेक जीव तुमच्या - आमच्यासमोर नाहीसे होऊन जातात सूर्योदय आणि सुर्यास्ताच गणित कधी चुकत नाहीत पण माणसाच्या जगण्यातली गणितं मात्र कळत नकळत चुकतातच. आणि तसही जन्मापासूनच हे गणित कधीच चुकलेलं नाही. मग हे आयुष्य किती दिवसाच ………. ?
     खरच लहानपणीचं ते सुंदर असे दिवस  खेळण , बागडण आणि ती निष्पाप निरागसता या सगळ्या गोष्टी कुठेतरी हरवल्या आहेत. ती चिमुकली त्या हरवलेल्या लहानपणाचा पाठलाग करत आहे . त्या आठवणींचा शोध घेत आहे. जेव्हा त्या चीमुकालीसारखे दिवस आपण सुद्धा अनुभवलेले असतात आणि जेव्हा आपल्याला मोकळीक देणारं कोणी नसत , आपल्याला कोणी जाणून घेणारं नसत , कोणासोबत व्यक्त व्हाव म्हटल तर आपल्यासाठी दुसर्या व्यक्तीला वेळ नसतो. सतत कामाचा ताण , मनाचा गोंधळ , आपलं म्हणणारं कोणी आहे का याचा शोध घेणारं ……… हि मनाची गुंतागुंत सोडवणारी कोणी असेल तर त्या माऊलीच्या मायेचा गोडवा ……………… !   
कोणावर तरी प्रेम करायचं , कोणासाठी तरी झगडायचं , कोणावर तरी विसंबून राहायचं , कोणासाठी तरी काम करायचं , कोणासाठी तरी खोटं बोलायचं , कोणासाठी तरी तितकाच मारही खायचा , कोणासाठी तरी वाईट काम सुद्धा करायचं , कोणावर तरी जबरदस्तीही करायची, कोणाचे तरी भाव जपायचे , कोणाचेतरी अश्रू पुसायचे , कोणासाठी तरी कोणाचा तरी स्वार्थीपणाने विचार करायचा हे सगळ लाइफस्टाइल हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात सुरु आहे आणि अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश या लाइफस्टाइलमध्ये होत असतो. हे सांगण्याच तात्पर्य अस कि आपल्या लहानपणीच्या जगण्यात आणि आताच्या जगण्यात किती व्यापक अशी तफावत दिसून येते. 
     म्हणजे प्रत्येकजण स्वतःच्या हिताचा विचार करतो पण त्या बालपणाच्या निरागसतेचा कोणी एका क्षणासाठी सुद्धा विचार करत नाही. ह्या चिमुकलीची किलबिल सुद्धा कोणी तयार नसत. ती मात्र हरवलेल्या बालपणाचा शोध घेण्यातच गुंतून गेलेली असते. 
 त्या चिमुकलीचे ते अबोल भाव काळजाला जेव्हा स्पर्शून जातात आणि  ते हरवलेले बालपण आपणही क्षणार्धात शोधू लागतो., कुठेतरी आपण आपल्या बालपणाचा विचार करू लागतो., आपल्याला आपल्या बालपणाची हुरहूर लागते ह्या सगळ्या गोष्टी केव्हा होतात केव्हा घडतात …………. ? तर जेव्हा आपल्याला हवीहवीशी वाटणारी माणस आपल्या सानिध्यात राहतात , आपल्याला समजून घेतात,   
ण काहीही झाल तरी हरवलेलं बालपण शोधण्यात सुद्धा एक वेगळीच मज असते. आपल्या जीवनात एक प्रकारे नवलाईचं वातावरण निर्माण होतं. जरी आपण आपल हरवलेलं बालपण शोधत असलो तरीही आपल्याला नवीन आठवणींची साठवण करता येते, अनोळखी व्यक्तींसोबत एक नाव नात निर्माण होतं, बरेचशे चागले-वाईट अनुभव घेत येतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण कोणासाठी तरी स्पेशल असतो किंवा नसतोही पण आपल्याला आपल्या धेय्यापुर्तीकडे नेण्याचं काम माऊली करत असते त्याचबरोबर आपल्याला आपल्या हरवलेल्या  बालपणाची आठवण करून देत असते आणि जगण्यातली ती चिमुकली सतत त्या गोष्टींचा शोध घेण्यातच मग्न असते ते या माउलीचं काळीज जपण्यासाठी……… ! 

बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

कॉपी पेस्टचा नवा ट्रेंड ………… !

 अलीकडेच यंग जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी पेस्टचं फॅड निर्माण झाल आहे. स्वातंत्रपूर्व काळात कॉपी करण्यासठी मनात भय आणि धाडस या दोनही गोष्टीनी विचाराचं चक्र सुरूं व्हायचं तेव्हाच्या कॉपी पेस्ट मध्ये आणि आताच्या कॉपी पेस्ट मध्ये बराच फेरबदल झालेला दिसून येतो पूर्वी मनात भय असायचं आपली कॉपी पकडली गेली तर आणि कही येत नाहीय म्हणून कॉपी करण्यासाठी मनाची तयारी तर पाहिजेच त्यामुळे पूर्वी कॉपी करण्याच भय जास्त आणि धाडस कमी अशी परिस्थिती निर्माण व्हायची. तेव्हा कॉपी करणं म्हणजे काहीतरी अपराध किंवा खूप मोठी चूक केली आहे अस वाटायचं आणि तेव्हा मात्र वेताच्या छडीने मार खाणं म्हणजे नेमक काय ही संकल्पना चांगलीच समज देऊन जात असे.
      हे सांगण्याचा उद्देश असा कि २१ व्या शतकात म्हणजेच जागतिकीकरणाच्या कालखंडात माध्यमांनी व्यापक प्रमाणात प्रगती केली आहे. आणि या प्रगतीचा परिणाम एकंदरीतच जनमत , मानसिकता , मानवी स्वारस्य , समाजकारण , राजकारण , अर्थकारण , संस्कृती , आधुनिकीकरण , फॅशान , अशा अनेक गोष्टींवर दर्शवत आहे. 
      आता कॉपी पेस्ट च्या माध्यमाने भय आणि धाडस या संकल्पना मोडकळीस आणल्या आहेत. तरुण वर्गामध्ये तर दिवसेंदिवस कॉपी पेस्टचं प्रमाण वाढते आहे. आणि तितक्याच झपाट्याने प्रगतीही होत आहे. पूर्वी कॉपी पेस्ट म्हटलं कि आपल्याजवळ चीट बाळगायची नाहीतर ह्याला त्याला विचारायचं इतकच माहित होतं पण आता कॉपी पेस्टमध्येसुद्धा वेगवेगळया पद्धती आल्या आहेत. उदाहरणार्थ : - इंटरनेटच्या माध्यमातून कॉपी पेस्ट  ही पद्धत सोप्या रीतीने हाताळता येऊ लागली कॉपी म्हणजे केवळ चीट बाळगण हा प्रकार मर्यादित न राहता अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून हाताळण सोपं झालं. 
     थोडक्यात आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार आपण हव्या त्या गोष्टी सहज सर्च मारून कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ : - फोटो , व्हिडीओ , एखादी माहिती इत्यादी ……
      हल्लीची परिस्थिती अशी झाली आहे कि कॉपी पेस्ट शिवाय कोणताही काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मानवाच्या गरजा वाढू लागल्या आहेत. आणि विचार करण्याची शक्तीचा यामुळे पूर्णतः अस्त झाला आहे.
      पण हल्लीच्या धकाधकीच्या जगण्याचा विचार केला असता कॉपी पेस्टच्या या नव्या ट्रेंडमुळे माणसाचं जगणं कुठेतरी सोपं झाले आहे. अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे कॉपी पेस्टची संकल्पना व्यापक स्वरुपात विस्तारली आहे.  कारण कॉपी पेस्ट हि संकल्पना केवळ परीक्षा स्वरूपातच अस्तित्वात न राहता माध्यमांद्वारे त्याचे स्वरूप बदलले . थोडक्यात सांगायचे तर माध्यमांनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याचे संशोधन करून कॉपी पेस्टची विशिष्ट स्वरुपात मांडणी करून त्याचे स्वरूप निदर्शनास आणले . कॉपी पेस्टमुळे माध्यमांचा दर्जा वाढू लागला , त्याचबरोबर मानवालाही प्रसिद्धी मिळू लागली. 
     पण तरीही मानव आणि यंत्र यांच्यामध्ये जास्त अधिक प्रमाणात तफावत असते. उदा . ते यंत्र तयार करण्याच काम मानव करतो आणि मानवाच्या तल्लख बुद्धीच्या वापराने ते यंत्र काम करू लागते . पण तरी सुद्धा मानव त्या यंत्राचा त्या माध्यमाचा गुलाम बनतो. पण मानवाच्या स्वार्थी आणि हव्यासक वृत्तीमुळे स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतो. आणि स्वतःच्या गरजेचा , सोयींचा  विचार करून आपण आपला दर्जा वाढवण्याकरता सतत प्रयत्नशील असतो परंतु ते माध्यम हाताळण्याच गांभीर्य विसरतो , सामाजिक जाणीव विसरतो .
     साधारणतः तसं पाहायला गेलं तर आपल्या हे लक्षात येईल कि जेव्हा आपण आपल्या जगण्यातल्या बर्याच गोष्टी समाजाशी जोडून घेत असतो रिलेत करत असतो तेव्हा ती गोष सामाजिक जाणीव , त्या गोष्टींच गांभीर्य , जबाबदारी या घटकांनी चहू बाजूंनी वेधून टाकलेलं असतं त्यामुळे मी अस म्हणते कि ज्याप्रमाणे आपण समाजाच्या चौकटीत जगात असताना वावरताना प्रत्येक प्रसंगानव्ये आपल्या हिताचा , आपल्या मानमर्यादेचा , सुरक्षेचा विचार करतो त्याचप्रमाणे आपण तितक्याच जोखमीने प्रसार माध्यमांचा सुद्धा विचार करायला हवा . 
     अर्थातच सध्य परिस्थितीचा एकंदरीत विचार करता आपण समजू शकतो कि मुळातच मध्यम हि एक व्यापक संकल्पना आहे. आणि काळाची गरज हा एक मानवी स्वारस्याचा भाग तर झाला आहेच पण त्याचबरोबर माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. आणि ह्या माध्यम बदलांच्या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे घटकांमुळे आज कॉपी पेस्ट चा  नवा ट्रेंड प्रगतीकडे झपाट्याने झेप घेत आहे.      
      आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता कॉपी पेस्टमुळे जरी साध्य करता आल्या तरी या सगळ्या घटकांचा अभ्यास करून संशोधनाद्वारे या घटकांचे क्षेत्र विस्तारते. त्याचप्रमाणे मानवी स्वरास्यामुळे त्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते.