बुधवार, २६ नोव्हेंबर, २०१४

कॉपी पेस्टचा नवा ट्रेंड ………… !

 अलीकडेच यंग जनरेशनमध्ये मोठ्या प्रमाणात कॉपी पेस्टचं फॅड निर्माण झाल आहे. स्वातंत्रपूर्व काळात कॉपी करण्यासठी मनात भय आणि धाडस या दोनही गोष्टीनी विचाराचं चक्र सुरूं व्हायचं तेव्हाच्या कॉपी पेस्ट मध्ये आणि आताच्या कॉपी पेस्ट मध्ये बराच फेरबदल झालेला दिसून येतो पूर्वी मनात भय असायचं आपली कॉपी पकडली गेली तर आणि कही येत नाहीय म्हणून कॉपी करण्यासाठी मनाची तयारी तर पाहिजेच त्यामुळे पूर्वी कॉपी करण्याच भय जास्त आणि धाडस कमी अशी परिस्थिती निर्माण व्हायची. तेव्हा कॉपी करणं म्हणजे काहीतरी अपराध किंवा खूप मोठी चूक केली आहे अस वाटायचं आणि तेव्हा मात्र वेताच्या छडीने मार खाणं म्हणजे नेमक काय ही संकल्पना चांगलीच समज देऊन जात असे.
      हे सांगण्याचा उद्देश असा कि २१ व्या शतकात म्हणजेच जागतिकीकरणाच्या कालखंडात माध्यमांनी व्यापक प्रमाणात प्रगती केली आहे. आणि या प्रगतीचा परिणाम एकंदरीतच जनमत , मानसिकता , मानवी स्वारस्य , समाजकारण , राजकारण , अर्थकारण , संस्कृती , आधुनिकीकरण , फॅशान , अशा अनेक गोष्टींवर दर्शवत आहे. 
      आता कॉपी पेस्ट च्या माध्यमाने भय आणि धाडस या संकल्पना मोडकळीस आणल्या आहेत. तरुण वर्गामध्ये तर दिवसेंदिवस कॉपी पेस्टचं प्रमाण वाढते आहे. आणि तितक्याच झपाट्याने प्रगतीही होत आहे. पूर्वी कॉपी पेस्ट म्हटलं कि आपल्याजवळ चीट बाळगायची नाहीतर ह्याला त्याला विचारायचं इतकच माहित होतं पण आता कॉपी पेस्टमध्येसुद्धा वेगवेगळया पद्धती आल्या आहेत. उदाहरणार्थ : - इंटरनेटच्या माध्यमातून कॉपी पेस्ट  ही पद्धत सोप्या रीतीने हाताळता येऊ लागली कॉपी म्हणजे केवळ चीट बाळगण हा प्रकार मर्यादित न राहता अनेक गोष्टी इंटरनेटच्या माध्यमातून हाताळण सोपं झालं. 
     थोडक्यात आपल्या सोयीनुसार आपल्या गरजेनुसार आपण हव्या त्या गोष्टी सहज सर्च मारून कॉपी पेस्ट करून घेऊ शकतो. उदाहरणार्थ : - फोटो , व्हिडीओ , एखादी माहिती इत्यादी ……
      हल्लीची परिस्थिती अशी झाली आहे कि कॉपी पेस्ट शिवाय कोणताही काम पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस मानवाच्या गरजा वाढू लागल्या आहेत. आणि विचार करण्याची शक्तीचा यामुळे पूर्णतः अस्त झाला आहे.
      पण हल्लीच्या धकाधकीच्या जगण्याचा विचार केला असता कॉपी पेस्टच्या या नव्या ट्रेंडमुळे माणसाचं जगणं कुठेतरी सोपं झाले आहे. अनेक सोयी उपलब्ध झाल्या आहेत. तंत्रज्ञानामुळे कॉपी पेस्टची संकल्पना व्यापक स्वरुपात विस्तारली आहे.  कारण कॉपी पेस्ट हि संकल्पना केवळ परीक्षा स्वरूपातच अस्तित्वात न राहता माध्यमांद्वारे त्याचे स्वरूप बदलले . थोडक्यात सांगायचे तर माध्यमांनी लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून त्याचे संशोधन करून कॉपी पेस्टची विशिष्ट स्वरुपात मांडणी करून त्याचे स्वरूप निदर्शनास आणले . कॉपी पेस्टमुळे माध्यमांचा दर्जा वाढू लागला , त्याचबरोबर मानवालाही प्रसिद्धी मिळू लागली. 
     पण तरीही मानव आणि यंत्र यांच्यामध्ये जास्त अधिक प्रमाणात तफावत असते. उदा . ते यंत्र तयार करण्याच काम मानव करतो आणि मानवाच्या तल्लख बुद्धीच्या वापराने ते यंत्र काम करू लागते . पण तरी सुद्धा मानव त्या यंत्राचा त्या माध्यमाचा गुलाम बनतो. पण मानवाच्या स्वार्थी आणि हव्यासक वृत्तीमुळे स्वतःचा स्वाभिमान गमावून बसतो. आणि स्वतःच्या गरजेचा , सोयींचा  विचार करून आपण आपला दर्जा वाढवण्याकरता सतत प्रयत्नशील असतो परंतु ते माध्यम हाताळण्याच गांभीर्य विसरतो , सामाजिक जाणीव विसरतो .
     साधारणतः तसं पाहायला गेलं तर आपल्या हे लक्षात येईल कि जेव्हा आपण आपल्या जगण्यातल्या बर्याच गोष्टी समाजाशी जोडून घेत असतो रिलेत करत असतो तेव्हा ती गोष सामाजिक जाणीव , त्या गोष्टींच गांभीर्य , जबाबदारी या घटकांनी चहू बाजूंनी वेधून टाकलेलं असतं त्यामुळे मी अस म्हणते कि ज्याप्रमाणे आपण समाजाच्या चौकटीत जगात असताना वावरताना प्रत्येक प्रसंगानव्ये आपल्या हिताचा , आपल्या मानमर्यादेचा , सुरक्षेचा विचार करतो त्याचप्रमाणे आपण तितक्याच जोखमीने प्रसार माध्यमांचा सुद्धा विचार करायला हवा . 
     अर्थातच सध्य परिस्थितीचा एकंदरीत विचार करता आपण समजू शकतो कि मुळातच मध्यम हि एक व्यापक संकल्पना आहे. आणि काळाची गरज हा एक मानवी स्वारस्याचा भाग तर झाला आहेच पण त्याचबरोबर माध्यमांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलताना दिसत आहे. आणि ह्या माध्यम बदलांच्या नाविन्यपूर्ण गोष्टींमुळे घटकांमुळे आज कॉपी पेस्ट चा  नवा ट्रेंड प्रगतीकडे झपाट्याने झेप घेत आहे.      
      आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी आता कॉपी पेस्टमुळे जरी साध्य करता आल्या तरी या सगळ्या घटकांचा अभ्यास करून संशोधनाद्वारे या घटकांचे क्षेत्र विस्तारते. त्याचप्रमाणे मानवी स्वरास्यामुळे त्याला एक वेगळे स्वरूप प्राप्त होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा