बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

माझं स्टेटस हीच माझी ओळख ……………!

     हल्ली स्वतःची एक नाविण्यपूर्ण ओळख बनवण्यासाठी स्टेटसचा चांगलाच ट्रेंड आला आहे. आणि ही ओळख प्रसारमाध्यमांमुळे निर्माण झाली आहे. आनंद , दुःख , साठवणी , भावना या सगळ्या गोष्टी आपल्या स्टेटसमध्ये सामावून जातात. आणि त्या आपण माध्यमांद्वारे व्यक्त करत असतो. आपल्याला  त्या व्यक्त करायच्या नसतात पण त्या माध्यामप्रभावी  व्यक्त होत जातात. 
उदाहरणार्थ :- whatsup आपण या संवादाच्या माध्यमातून केवळ चर्चाच करत नाही तर आपण आपली ओळख दाखवण्याकरता , निर्माण करण्याकरता छान फोटो अर्थात whatsup dp म्हणून ठेवतो. , त्याचप्रमाणे प्रत्येक बदलत्या वेळेनुसार , दिवसानुसार , वातावरणानुसार  , आणि आपल्या उत्साहानुसार-मानसिकतेनुसार आपण आपले स्टेटस ठेवत असतो आणि सतत बदलत असतो त्यालाच एक प्रकारे माध्यमांद्वारे व्यक्त होणे अस म्हणतात. 
     खर तर एक स्मायली सिम्बॉल सुद्धा आपल्या भावनांना मोकळीक देत असते. तसं म्हणायचं झाल तर हल्ली नात्यातला गोडवा सुद्धा माध्यमातून व्यक्त करता येऊ लागला आहे. उदाहरणार्थ :- मामा , काका , दादा , ताई कोणीही नातेवाईक असोत कोणाचा वाढदिवस असो, व कोणाच्या प्रमोशनची बातमी असोत पार्टी स्टेटस सुद्धा झळकावणं शक्य झालंय. हे नातं भावतं कि नाही हे तर माहीत  नाही पण कुठेतरी एक जिव्हाळा व्यक्त करता येतो हे मात्र खर …… ! 
     स्वतःची ओळख निर्माण करणारं  स्टेटस आपल्याला आपल्या ओळखीपर्यंतच मर्यादित ठेवत नाही तर आपल्या मानसिकतेमध्ये आपल्या विचारांमध्ये सुद्धा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो थोडक्यात आपल्यामध्ये आपसूकच  एक प्रकारचा इगो , अतिआत्मविश्वास निर्माण होत जातो. आणि आपल्या वागण्या - बोलण्यात सुद्धा अधिक प्रमाणात फेरबदल झालेला दिसतो, हा आपल्यामध्ये झालेला बदल बरेचदा स्वतःला दिसून येत नाही पण आपले आई-बाबा , शेजारी वा मित्र-मैत्रीणीना दिसून येतात. आपल्या राहणीमानाला एक वेगळा लूक येतो. आपल्या भाषेत , आपल्या खानपानात बदल, वेशभूषा , केशभूषा , असे अनेक बदल आपल्यामध्ये घडून येताना दिसतात. उदाहरणार्थ : - आपल्या बोलीभाषेला glamarar शब्दांच स्वरूप प्राप्त झालं आहे. थोडक्यात hiiiiiii - hello ,  wts up . त्याचप्रमाणे खानपानाच्या पद्धतीत बदल झाले थोडक्यात स्वतंत्रपूर्व काळापासून भारतामध्ये वरण-भात , भाजी-पोळी असे मोजकेच आणि मर्यादित खाद्यपदार्थ माहित होते पण आता २१ व्या शतकात तस राहिलेलं नाही. प्रसारमाध्यमांमुळे अनेक खाद्यपदार्थांना सुद्धा ओळख निर्माण झाली. नवनवीन पदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर, चायनीज अशा फास्ट फूड , जंक फूड अशा खाद्यपदार्थांची ओळख निर्माण झाली आणि ती ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता त्या पदार्थांना प्रसिद्धीबरोबरच लोकांच्या राहणीमानास अनुसरून एक नवं लाइफस्टाईल प्राप्त झाल आहे त्यामुळे मानवी स्वारस्याला चालना मिळत आहे. 
      तसेच पेयांमध्ये सुद्धा जूस, कोल्ड्रिंक्स त्यामध्ये पण कोक , पेप्सी , सोडा , मिरिंडा अशे बरेच प्रकार असतात त्यातही विविध प्रकारचे रंग , फ्लेवर असतात आणि हल्लीच्या तरुण पिढीसाठी ह्या पेयांच सुद्धा नवीनच फॅड आल आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं या कोल्ड्रिंक्सवरुनसुद्धा आपले स्टेटस ठरतात. आणि त्या बदलत्या स्टेटसनुसार आपली मानसिकताही तेवढ्याच जलद गतीने बदलत जाते ती बदलण्यास माध्यमं प्रोत्साहन देत असतात.  
     साधारणतः सध्या त्यामानाने पूर्वी आपल्या भावना मनाच्या हळव्या कप्प्यातच व्यक्त कराव्या लागायच्या पण आता प्रसारमाध्यमांमुळे मानवाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पूर्वी तर आणि पत्र पाठवण्यापलीकडे दुसरा माहितीचा काहीच सोर्स नव्हता. पण आता तसं राहिलेलं नाही १९९१ मध्ये जागतिकीकरणाचा उदय झाल्यामुळे अनेक सोयी उपलब्ध झाल्या माध्यम तंत्रज्ञानाला चालना मिळाली , समाजामध्ये मानवी स्वारस्य निर्माण झालं आणि नवनवीन गोष्टींचं फॅड निर्माण होऊ लागलं. माध्यमांद्वारे व्यक्त होता येऊ लागलं. , मोकळीक मिळू लागली , विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली , आणि मानवी स्वारस्यानुरूप स्टेटस ची ओळख निर्माण झाली.  
      त्याचप्रमाणे comment , प्रतिक्रिया , सिम्बॉल , मेसेंजर सारख्या अनेक सोर्समुळे आपल्या स्टेटसला एक नाविन्यपूर्ण रचना प्राप्त झाली. या सोर्सद्वारे आपल्याला आपली मत व्यक्त करता येऊ लागली , आपल्यामध्ये मतपरिवर्तन होऊ लागलं त्या त्या स्टेटसनुसार त्या त्या वातावरणानुसार आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावं हे स्टेटसच्या फॅडमुळेच लक्षात येऊ लागलं. तेहापासून फॅशनचं नवं युग सुरु झालं. 
     तसं पाहायला गेलं तर माध्यमांमुळे सध्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा आलेल्या नसल्या तरीही नाती जपण्याला आणि जवळीक साधण्याला मात्र नक्कीच आर्यादा आलेल्या आहेत. कारण स्टेटसने आपण आपली ओळख निर्माण करू शकतो , मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो पण तरीही माध्यमांनी जपलेला जिव्हाळा आणि जगण्यातला जिव्हाळा जपण्यात मात्र खूप फरक असतो. थोडक्यात जवळच्या नात्यांपुढे दुरावा असणारी नाती हे केवळ माध्यमांसारखीच आपण चालवू तशीच चालतात. स्टेटसचं हे फॅड केवळ एक मनोरंजनच साधन आहे. तेवढ्यापुरता सुगावा , समाधान देण्याचं काम स्टेटस करत असंत. 
      या जगण्यातून आपल्याला स्टेटस ठेवण्यासाठी अनेक विषय सुचत जातात , मिळत जातात आणि त्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. 

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

अनुभव घेण्यासाठी इंटर्नशीपचा नवा क्रेझ………!

पंधरावी पर्यंत शिक्षण घेताना प्रत्येकजण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मात्र त्या गाठलेल धेय्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी माणूस आपल्या जगण्याचे आपल्या आयुष्याचे दोन टप्पे सतत अभ्यासत असतो , आणि चांगले वाईट क्षण अनुभवत असतो. ते म्हणजे  पंधरावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा पहिला टप्पा असतो आपल्याला आपल्या जबाबदा-यांची जाणीव होणं  आणि दुसरा टप्पा असतो नोकरीचा शोध घेण………………? 
      अलीकडेच सध्या मोफत काम शिकण्याचा इंटर्नशीपचा नवा क्रेझ आला आहे. थोडक्यात सांगण्याच तात्पर्य असं कि पूर्वी असं काही नव्हतं पूर्वी उत्तीर्ण पदव्यांना प्रथम प्राधान्य देऊन थेट नोकरीसाठी त्या त्या व्यक्तीची निवड केली जायची परंतु आता काळानुसार एकंदरीत सगळ्याच पद्धतींमध्ये बदल घडून आले आहेत. शैक्षणिक स्पर्धा वाढू लागल्या आहेत. माध्यम पद्धतींमध्ये बदल घडून येत आहेत. माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांमध्ये मानवी स्वारस्य निर्माण होऊ लागले आहे. लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडू लागले आहेत. शिक्षणपद्धातीचे स्वरूप बदलत चालले आहे. आणि बदलत्या शिक्षणपद्धतीचा इंटर्नशीपवर व्यापक प्रमाणात प्रभाव पडू लागला आहे. 
     कारण सध्या नोकरी क्षेत्रात  माध्यम तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे.  त्यामुळे स्पर्धा वाढू लागल्या आहेत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे पूर्वी त्यांच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना प्रथम प्राधान्य दिल जायचं पण हल्ली तुमच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना तितकासं प्राधान्य दिलं जात नाही. तर तुमच्या प्रायोगिक ज्ञानाला , तुमच्यातल्या आत्मविश्वासाला , कृतीला ,  क्रिएटिव्हीला , तुम्ही सतत अपडेट राहण्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि त्याकरता अनुभव घेण्यासाठी माध्यमांनी इंटर्नशीपचा नवा क्रेझ निर्माण केला आहे. कि तुमच्या शिक्षणासोबत तुमच्यातलं ज्ञान हे केवळ थिअरी पुरतंच मर्यादित न राहता ते आपल्या कृतीतून दिसावं आणि आपण सतत अपडेट राहावं. 
     इंटर्नशीप करण्याची ही पद्धती एक प्रकारे मोफत काम शिकण्याची आणि त्याहून अधिक जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची आपलं धेय्य सार्थकी लावण्याची पहिली पायरी आहे. एकंदरीतच इंटर्नशीप करताना आपल्याला ब-याच गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ :-  पुस्तकांचे संदर्भ , लेखनाची एक विशिष्ट शैली , भाषा , मानवी स्वारस्य , जनमत आणि लोकांची मानसिकता , वर्तमानपत्रांची माहिती थोडक्यात लेआऊट , डिझाईन , विपणन , वितरण , जाहिराती आणि वृत्तसंस्थांच महत्व , मूल्यमापन , बातमीचं अथवा त्या त्या विषयाचं गांभीर्य तसेच वर्तमानपत्राच्या पानाच आणि चौकोनातल्या बातमीच महत्त्व, लेख , अग्रलेख , संपादकीय पान , छायाचित्र , फिचर अशा खूप स-या गोष्टी इंटर्नशीपमध्ये प्रत्यक्ष काम करताना अनुभवायला मिळतात. अनेत गोष्टी जाणून घेत येतात. अनेक विषय चर्चेस येतात , समजू लागतात. विचारांची देवाण-घेवाण होते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपले मत मांडण्याला मत परिवर्तन करण्याला वाव मिळतो. प्रत्येकाला मोकळे पणाने जगता यावं याकरता माध्यम शास्त्राने तरुणाईला इंटर्नशीप नामक स्त्रोताचा नवा मार्ग खुला करून दिला आहे. 
     जेणेकरून आताच्या तरुणाईला लोकांपर्यंत त्यांच्या विचारापर्यंत आणि त्यांच्या मतांपर्यंत पोहोचता येईल तसेच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना  नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही साधारणतः ६ महिने मोफत काम शिकून आपल्याला त्या कामाच्या मोबदल्यात काम केल्याच प्रमाणपत्र मिळते आणि जर आपण त्याच ठिकाणी नोकरी करण्यास इच्छुक असल्यास आपण नोकरी करू शकतो. 
      इंटर्नशिप करतानाचे आपले अनुभव खूपच निराळे असतात. उदाहरणार्थ :- पत्रकारितेत काम करत असताना शिक्षक आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगत असतात कि तू पत्रकार म्हणून समाजात वावरताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती असण फार आवश्यक आहे आही हल्ली माध्यमच इतकी प्रगत झाली आहेत कि वाचन करणं हि संकाल्पनाच कुठेतरी नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वाचनांच प्रमाण  खूप कमी होत चालल आहे असं दिसून येतंय. अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या आयुष्यातून वगळून टाकलेल्या असतात त्या आपल्याला या इंटर्नशीपच्या माध्यमातून उमगू लागतात.  
     त्याचप्रमाणे एकत्र काम करतानाची एक वेगळीच मज्जा सर्वांसोबत अनुभवायला मिळते. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत , एक वेगळी स्पेशालिटी जाणून घ्यायला मिळते. एकत्र काम करण्याबरोबरच वास्तवात एक नाविण्यपूर्ण आनंद लुटला येतात.  एकत्रितपणे काम करून काम करण्याची नाविण्यपूर्ण इच्छाशक्ती प्राप्त होते. स्वतःला घडवण्याची  उर्जा सतत काही न काही कौशल्य दर्शवत असते. आणि आपल्यातल्या केलेला एक वेगळी ओळख निर्माण करून देते आणि मानाचं स्थान मिळवून देणारं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष काम करताना घडत जाते. 
     इंटर्नशीप करताना आपला मानसिक , बौद्धिक , सामाजिक , आर्थिक , राजकीय  , सांस्कृतिक असे विविध टप्पे  आपल्याला समजत जातात आणि विकसित माध्यमांसोबत इंटर्नशीपला सुद्धा विद्यार्थ्यांचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला आणि एक प्रकारचं विकसित स्वरूप प्राप्त झालं. 

     

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

आयव्ही नावाची सहल…………………………. !

खरं तर आयव्ही म्हणजे काय हेच माहित नसे. आयव्ही या शब्दाची ओळख मात्र तेरावीला असताना झाली. मला तर अगदी बारावीपर्यंत सहल इतकच माहित होतं. आणि सहल म्हणजे मज्जा करणं इतकीच मानसिकता तयार झालेली असायची. पण म्हणतात नं कि आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले विचार बदलत जातात आणि आपल्या करीयरची सुरुवात ज्ञानापासून होत असते आणि त्या ज्ञाना गांभीर्य आपल्याला समजते. 
     हि आयव्ही नावाची सहल आपल्याला कळत नकळत बरेच काही अनुभव देऊन जातात आणि तेच क्षण मी अनुभवले आहेत. आयव्हीला जायचं म्हणजे ग्रूपशिवाय मज्जाच नाही. धमाल , मस्ती , चर्चा , सेटिंग या सगळ्याच गोष्टींसाठी ग्रुप हा हवा असतोच त्याशिवाय आयव्ही तरी परिपूर्ण कशी होऊ शकेल ? असोत पण आयव्ही नामक सहल ही केवळ मज्जा नाही तर हे एक अभ्यासाचं माध्यम आहे. सुरुवातीला मलासुद्धा हे समजल्यावर आश्चर्य वाटलं होतं पण खरच कधी कल्पनाच केली न्हवती कि आयव्ही हे एक इतक प्रभावशाली माध्यम असेल म्हणून. 
     म्हणजे आता बघा न मी १४ वी ला असताना आमची आयव्ही केरळला गेली होती. निसर्गाचा तेजोमयपणा , त्या निसर्गाचं सौंदर्य , आणि पर्यावरणाची काळजी घेणारी तेथील माणसं गेली कित्येक वर्ष यांनी तो जिव्हाळा जपला आहे, त्या निसर्गाच्या भावना जाणल्या आहेत. आणि केरळच मुख्य वैशिष्ट्य हे आहे कि तेथील सरकारला सुद्धा आपल्या राज्याची आणि मुख्यत्वे पर्यावरणाची पुरेपूर जाणीव आहे.  या निसर्गसौंदर्याने केरळची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अभिमान वाटतो कि तेथील सरकार आपल्या जबाबदा-या लक्षपूर्वक पार पाडते आणि खंत एकाच गोष्टीची वाटते की भारतात तर गेली कित्येक वर्ष पर्यावरणाच भान हरपलंय पर्यावरणाची उणीवही कोणाला भासत नाही आणि प्रदूषण अथवा आरोग्यासंदर्भात कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तरीही सरकार शांतच………? हे किती घृणास्पद आहे म्हजे थोडीही लाज नसावी…………? 
     हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे कि हल्लीच्या तरुणाईला या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो आणि जेव्हा आयव्ही सारख्या माध्यामातून आपल्याला  अशा गोष्टींची माहिती मिळत जाते तसतशी आपल्या ज्ञानात वाढ होत जाते आपल्याला जबाबदा-यांची जाणीव होते आणि आपण अनेक विषयांवर चर्चा करू लागतो , विचार करू लागतो, त्या त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळू लागतं. 
     साधारणतः आपण जेव्हा आयव्हीला फिरायला जातो तेव्हा त्या कालावधीत आपल्यामध्ये एक जाणतं आणि आपुलकीचं नातं काळत नकळत कधी निर्माण होत जात हे आपल आपल्यालाच ठाऊक नसतं. आणि एखाद्या ठिकाणी फिरताना आपल्याला त्या ठिकाणची संस्कृती , भाषा , खाद्यपदार्थ , त्यांची समाजात वावरण्याची एक पद्धती , तेथील ऎतिहासिक बांधकामाची माहिती मग त्यातही त्या शेकडो वर्षापूर्वीच्या बांधकामासाठी वापरलेले शिल्पं आणि शिल्पकार , त्या कालावधीत झालेली युद्ध अशी खूप सारी माहिती आपल्याला या आयव्ही नामक माध्यमातून जाणून घेता येते. 
उदाहरणार्थ :- केरळमध्ये धार्मिक संकृतीचा तेथील लोकांवर व्यापक प्रमाणात प्रभाव आहे. तसेच केरळमध्ये संकृतीला पाहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि निसर्गावर प्रेम करणं हे तेथील लोकांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 
     ही माहिती मला आयव्हीच्या माध्यमातून मिळाली. आणि तेव्हा अभ्यास करण्याचं नवं माध्यम मला मिळालं येथपासून अनुभवांची शिदोरी माझ्या हाती लागली. प्रगतशील माध्यमातून प्रगतशील विचारांची देवाणघेवाण सुरु झाली. अगदी कुठेही फिरायला गेल्यानंतर तो विषय कधी त्या मनाच्या हळव्या कप्प्यात दडून जातो हे माझं मलाच कळत नसे.
    साठवणीच्या गाभा-यात आयव्ही हा विषय अगदीच जिव्हाळ्याचा विषय झाल्यापासून कुठेतरी असं जाणवू लागलं कि जगणं हे कधीच भावनांपर्यंत थांबत नसतं त्या भावना व्यक्त कारणासाठी या सहलीतून मला मोकळीक मिळत गेली. क्षणोक्षणी काही ना काही अनुभवणारं , भासवणारं , काळजाला स्पर्शून जाणारं , व्यक्त होणारं , भावणारं असं जगण्यातलं जगणं मला केवळ आठवणीनेच जपता आलं 
     फिरण्यातंन तर भरपूर आठवणी जपता आल्या , आणि आनंदाने व्यक्तही होता आलं पण खरी मज्जा तर ग्रुपमध्ये होती. ग्रुपमध्ये चर्चा करताना गॉसीप नावाचं माध्यम लागायचं ते गॉसिप अगदी ट्रेनमधील प्रवासापासून सुरु झालेलं असायचं आणि तरुणाईच्या चर्चा म्हणजे भाषेच्या प्रभावापासून परिणाम दर्शवण्यास सुरुवात व्हायची त्या तरुणाईच्या प्रभावी भाषेमध्ये शिक्षकांचाही सहभाग असायचा आणि या प्रवासात एकंदरीतच भाषेच्या माध्यमापासून होणारी सुरुवात हळूहळू सगळ्या माध्यमांच्या खोलात शिरायची. म्हणजे संवाद , विचारांची देवाण-घेवाण , फोटोग्राफी , विविध पुस्तकांचे संदर्भ , कविता अथवा शेरोशायरीची मैफिल आणि त्यातून होणारे हस्यविनोद सुद्धा कळत नकळत काही ना काही संदेश पोहोचवत असे.   
     प्रत्येकजण स्वतःच्या कलेची ओळख करून देताना त्या कलेला माध्यमाच स्वरूप प्राप्त झालं मात्र ज्ञान आणि जगणं या दोन्ही गोष्टींना आयव्ही नामक सहलीच्या माध्यमातून वाव मिळत गेला. त्याचप्रमाणे  तरुणाईला वेगवेगळे विषय मिळत गेले. आणि तरुणांमध्ये हळूहळू एक व्यापक दृष्टीकोण निर्माण होऊ लागला. 

मुलाखत :- सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणे आवशयक आहे का ?

शेखर सोनाळकर :- छात्र युवा संघर्ष वाहिनी . 
     माझ्या जीवनातली नव्याने अनुभव घेणारी ही पहिलीच मुलाखत, मनात तर प्रचंड भय होतं पण करायचं काय मुलाखत तर घ्यावी लागणारच प्रश्नांपेक्षा मनात भीतीनेच घर करून ठेवल होतं पण विषय अगदीच सोपा आणि हलका आणि मला झेपेल इतका साजेसा होता. पण मनात तर अजून एक भीती होती की मुलाखत देणारे कलीग कसे असतील, ते मला चांगला प्रतिसाद देतील न?, आणि मी इतक्या मोठ्या व्यक्तीशी कस बोलणार आहे बापरे अगदीच घामाने डबडबून गेले होते., मी त्यांना योग्य प्रश्न विचारू शकेल ना? माझ अज्ञान तर त्यांना दिसणार नाही न? असं प्रश्नाचं चक्र बराच वेळ सुरु होतं पण मनाची तयारी तर करावी लागणार होतीच आणि यापलीकडे विचार करण्यासाठी तितकासा वेळ सुद्धा नव्हता, अलीकडे थोड्या वेळातच मुलाखत सुरु होणार होती मनात भीती तर होतीच पण आईने मात्र मला माझा गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिला होता. मुलाखत सुरु झाली, शेखर सोनाळकरजी आणि मी समोरासमोर बसलो आमची तोंडओळख झाली आणि आमच्या संवादाला सुरुवात झाली. मी त्यांना प्रश्न विचारला कि सर सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणे आवश्यक आहे का ?…………………… ते जे सुरु झाले कि मला त्यांना पुढचा प्रश विचारण्याची संधीच त्यांनी मला दिली नाही त्या एका प्रश्नातच त्यांनी ही मुलाखत परिपूर्ण केली. तर आपण या मुलाखतीमधून त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेणार आहोत त्या पुढीलप्रमाणे :-
      ड्रेसकोडचा पहिला उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये फरक करता येऊ नये. दुसरा उद्देश श्रीमंत गरीब वर्गामध्ये फरक करता येऊ नये. , तिसरा उद्देश वेगवेगळ्या जाती धर्माची व्यक्ती वेगळी वेगळी ओळखता येऊ नये. , आणि चौथा उद्देश म्हणजे शिक्षकांची सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी समत्वाची असावी. कोण श्रीमंत आहे , कोण गरीब आहे , कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे , कोण हिंदू आहे , कोण मुसलमान आहे असे भेदभाव करता येऊ नयेत. त्यामुळे शिक्षकांची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी समत्वाची असावी. 
     महाविद्यालयांना ड्रेसकोड कंपल्सरी केल्याने सध्या होणार आहे का ? त्यांचा ड्रेस महाविद्यालय देणार आहे का ? की काळी पेन्ट आणि पंधरा शर्ट असं म्हटल्यानंतर अगदी ५० रुपयांपासून ते ५,००० पर्यंतचे पीस येतात त्याच्यातपण पांढरा शर्त अतिशय स्वस्तात्पासून कमालीच्या महागपर्यंत येतो आणि त्यात त्यात ड्रेसकडे पाहिल्यानंतर ते लक्षातही येते याचा दर्जा काय आहे ते……! जर का असं होणार असेल तर त्या ड्रेसकोडचा उद्देशच काय सफल होणार ?
     ड्रेसकोडचा आणखी एक उद्देश म्हणजे नीती स्तलावणे. साधारणतः विद्यार्थ्यांना थोडं मोकळ सोडणं आवश्यक असतं , त्यांच लहानपण संपलेलं आहे आता त्यांना स्वयंशिस्त अंगात आण अशी आशा असावी. आता त्यांना शिस्त लावण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना स्वयंशिस्त आणि थोडी मोकळीक असावी म्हणून महाविद्यालयालयामध्ये अजून ड्रेसकोड आलेला नाही. ; आता जे लोक असं म्हणतात की ड्रेसकोड लावावा त्यांना नेमकं काय हवाय , म्हणजे नेमकं ड्रेसकोड मागचं शास्त्रीय कारण काय ? कशासाठी हवाय ड्रेसकोड ? आणि ड्रेसकोड हवा असेलच तर तो केवळ विद्यार्थ्यांनाच का ? शिक्षकांना का नको ; शिक्षकांना सुद्धा पाहिल्यानंतर टिकली
लावणा-या , भांग पाडणा-या महिला पाहिल्यानंतर स्त्रिया हिंदू आहे हे लक्षात येतं मग शिक्षकांना सुद्धा कोण हिंदू - मुसलमान हे लक्षात यायला नको. विद्यार्थ्यांना सगळे शिक्षक सारखे असायला पाहिजेत. असं जर हवं असेल तर शिक्षकांना का ड्रेसकोड नको , प्राचार्यांना का नको ? आणि मग ड्रेसकोड यातनं काय साध्य होतं. विद्यार्थ्यांना काही मोकळीक मिळत नसेल मग ड्रेसकोचा हट्ट कशासाठी ? त्यामुळे ड्रेसकोड नसावा आणि ज्यांना ड्रेसकोड आणायचाच असेल त्यांनी यामागचं लॉजिक सांगावं. 
     जे अस म्हणतायत त्यांना ते मुलींवर बंधनं आणण्याकरता ड्रेसकोड ठेवायचा आहे मुलांकरता काही त्यांना ड्रेसकोड नकोय. म्हणजे आजच्या मुली जर अधिक मोकळे कपडे घालतात , अगदी स्पष्ट सांगायचं तर त्यांचे अवयव दिसतात जे दिसू नये असं जे संस्कृतिरक्षकांना वाटतंय त्यांना असं वाटतंय कि ड्रेसकोड असावा. तुम्ही ड्रेसकोड ठेवला तर मला सांगा तुम्ही पंजाबी ड्रेस आणि सलवार घालणं काय हो ? आणि जर आपण मुलींकरता ड्रेसकोड शर्ट pant ठेवला तर त्यातनं ज्याला बघायचं त्याला दिसतं , ज्याला दाखवायचं आहे त्याला दाखवता येतं म्हणजे ह्यातून संकृतीराक्षाकांचे हेतू साध्य होत नाहीत. आणि हे बंधनाच्या दृष्टीकोनातून जरा गंभीरच आहे. आणि मुळात तरुणवर्गाची मानसिकता बदलणार नाही…………!  

कॉलेज म्हणजे एक वेगळच जगणं ……….!

    
कला ती जी भावणारी , भासवणारी.  
कला ती जी ह्या हलक्याश्या काळजाला स्पर्शून जाणारी. 
कला ती जी वेदनेतून उमगणारी. 
तुमच्या आमच्यात बेभान होणारी…………!

धमाल, मस्ती ह्या गोष्टी तर नेहमीच होत असतात, पण यातल्या जगण्याला मात्र एक वेगळाच वलय प्राप्त झाल होतं ते म्हणजे 
कलेचं ……….!
     कलेचं उमगण काय असतं याचा अनुभव मात्र कॉलेजच्या कप्प्यातच अनुभवायला मिळाला .  कॉलेजचे 
लेक्चर्स सकाळी ७ ला सुरु झाले कि आम्ही सगळे मस्त लेक्चर्स बसायच. आणि लेक्चर्स संपले की मग काय? आम्ही सगळे कॉलेज कट्ट्याचे राजेच ……। दिवस आणि रात्र ही केवळ आमचीच.  एकमेकांना टाळ्या देत चं गप्पा मारायचो. बऱ्याच चर्चा व्हायच्या. त्यात एखादा गंभीर विषय कधी चर्चेस आला की कलेशी जोडलेली ती…।  मात्र त्या विषयावर विचार करण्यातच हरवून जायची. आणि प्रश्नांना उत्तर आहे की नाही या शोधतच गुंतून जायची ?  
     तो कट्टा मात्र जशी जादूची छडीच……! या लेखणीची सुरुवात या कॉलेज कट्ट्यापासूनच झाली अगदी मोहक . कट्ट्यावर जाऊन बसले की अनेक कविता, लेख सुचायचे. या सुचलेल्या कविता, लेख हळूच ह्या हलक्याश्या काळजाला स्पर्शून जायचे. त्या कवितांचं आणि लेखांच सुचण हे जाणीव निर्माण करून देणारं असायचं  जणू काही ह्या हलक्याश्या काळजातल पानच होत एक प्रकारे. लेख लिहिताना जशी कागदाची पानं पलटली जातात तसाच काहीसा हा कट्ट्यावरचा अनुभव. या काळजातल पानंही असंच पलटल जायचं आणि यातून अनेक विचार, संदर्भ, नवनवीन प्रश्न आपसूकच उमगायचे पण त्या कलेतली ती मात्र भावनांच्या गाभार्यात गुंतलेली अजूनही काहीतरी निसटून गेल्याचा आभास भासवणारी………? 
पण पुन्हा तीच मस्ती , तीच धमाल सुरु असायची. मस्त मैफील रंगत यायची. प्रत्येकामध्ये त्या कलेचं रुजणं दिसायचं आणि कोणी बेधुंद होऊन गाण गायचं , तर कोणी शायरी म्हणायचं , तर कोणी चित्रांच्याच दुनियेत रंगांची उधळण करताना दिसायचं. 
     कॉलेजमधल जगणं म्हणजे मनसोक्त आनंद घ्यायचा, नवनवीन मित्र-मैत्रिणी करायचे. त्या मैत्रीतल जगणं अनुभवायचं, लेक्चर्स बंक मारायचे ., प्रोजेक्ट बनवताना विचारांची देवाण-घेवाण करायची , एकमेकांचे प्रोजेक्ट्स कॉपी पेस्ट मारायचे आणि असे मजेदार अनुभव घ्यायचे . चर्चा करण तर नेहमीच सुरु असायचं आणि जबाबदारीच्या जाणिवांच्या गोष्टी कॉलेजच्या जगण्यातून अनुभवायला मिळाल्या. मूळातच अनुभवांशी आणि आठवणींशी जोडलेलं नातं काय असतं हा प्रश मात्र शेवटपर्यंत हे काळीजच कोरत होतं .  
     त्या कलेतली ती मात्र अजूनही तशीच होती काहीतरी शोधत असणारी …………? त्या कलेच्या साठवणीत बेभान होणारी. कॉलेजच्या कट्ट्यावर लेखन करण्याची मजाच काहीशी निराळी असायची. आणि अजूनही त्या आठवणीत जगताना मात्र कॉलेज कट्ट्याच स्मरण केल्याशिवाय लेखनाला सुरुवात होत नसे. मुळातच तो कट्टा अगदीच जिव्हाळ्याचा विषय झाला होता. त्या कलेतली ती आणि कट्ट्याच्या छायेत एक जाणतेपणाच नातं निर्माण झाल होतं. ह्या जगण्यातल जगणं काय असतं हे मात्र या कट्ट्यानेच तिला शिकवलं होतं. तिच्यातल्या अनुभवाची पहिली पायरी चढायला शिकवलं होतं या कॉलेज कट्ट्याने. हे कॉलेजचं वेगळ जगणं अनुभवताना हे काळीज बेभान होऊन गेलेलं असायचं. दिवस कधी मावळून जायचा कळायचच नाही. पण दिवसाची सुरुवात अगदी रसाळ आणि मावळती रात्र काहीतरी भासवणारी अगदी शांत , ही  भयान शांतता सुद्धा तिच्यात हरवून जाणारी असायची. 
       खर तर प्रत्येकासाठी कॉलेज म्हणजे एक वेगळ जगणं तर आहेच. प्रत्येकाच्या जगण्यात धमाल , मस्ती या गोष्टी होताच असतात ; पण त्याव्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकजण काहीना काही शिकत असतो, अनुभवत असतो आणि आपल्या गोष्टी एकमेकांमध्ये शेअर करत असतो. तसंच काहीसं तिचं जगणं होतं  आठवणी जपणं, कॉलेज कट्ट्यासोबत आपल्या गोष्टी शेअर करणं, छान कविता लिहिण्याचा आनंद लुटणं पण तरीही तिच्यातलं जगणं मात्र जरा वेगळंच होतं. 
      हव्या नको त्या सगळ्या गोष्टी या आठवणीत सामावून जायच्या. आणि कट्यावर बसून कविता करण्याची मजाच काही निराळी असायची. मनात आलेले विचार कागदार उतरवताना त्याला कधी कवितांच स्वरूप प्राप्त व्हायचं काही कळायचं नाही. तिच्या मनातले बोल कोऱ्या कागदावर उतरवण्याच तिला फार वेड असे त्यामुळे त्या कामात ती नेहमीच उत्सुक असायची. आणि त्यामुळे तिचा मनाचा ठाम निश्चय असायचा कि या कट्ट्याच्या सानिध्यात माझ्या काळजावर कोरलेल्या, जपलेल्या आठवणी अनुभव कोऱ्या कागदावर उतरवायच्या आहेत. कालांतराने मग कविता करण्याची आवडही निर्माण झाली. हवं तसं, हवं तेव्हा मोकळेपणाने व्यक्त होण्याच्या नव्या जगण्याला येथून सुरुवात झाली. 
     स्वतःला घडवण्याचा आत्मविश्वास या लेखणीने आणि नात्यातल्या जाणतेपणाने तिच्यातल्या कलेला मिळवून दिला आहे. 





बुधवार, १५ ऑक्टोबर, २०१४

सिझन प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनचा ………!

हल्ली तरुणाईच्या जीवनात प्रभावी माध्यमांच जाळ पसरत चाललं आहे. आणि एकंदरीतच या तरुणांच्या मानसिकतेवर याचा प्रचंड वेगाने परिणाम होत आहे. काळानुसार वास्तवात काय बदल घडवून आणावेत आणि काय बदल घडवून आणू नये इतपत बदल करणं सहजरित्या सोपं आणि शक्य झालं आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं कि माध्यमांद्वारे बदल घडवून आणणं जरी सोपी गोष्ट असली तरीही बदलत्या काळानुसार बदलता अभ्यासक्रम लक्षात घेता प्रकल्प बनवण्यासाठी आणि सादरीकरणासाठी तंत्रज्ञानाचा आणि प्रभावशाली माध्यमांचा उपयोग करण ही काळाची गरज झाली आहे. 
     खर सांगायचं तर कुठेतरी जेव्हा एका विद्यार्थी गटात आपण शिकत असतो तेव्हा डोक्यावर अभ्यासाचा बराच ताण आलेला असतो. आणि जागतिकीकरणाचा जन्म झाल्यामुळे एकंदरीतच लोकांच्या गरजा वाढू लागल्या, प्रत्येकाला आपल्या जगण्यात विशिष्ट बदल घडवून आणण्याच स्वातंत्र्य निर्माण झालं , त्याचबरोबर मानवी स्वारस्य लोकांमध्ये निर्माण होत गेलं, मग माध्यमं आली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या स्पर्धा वाढू लागल्या माध्यमांमुळे अभ्यासक्रमात फेरबदल करण सोपं झालं त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आणि  प्रेझेंटेशन या योजनांची आखणी करण्यात येऊन त्याला क्रेडीट सिस्टीमचे स्वरूप देण्यात आले. हे सांगण्याचा मूळ हेतू असा कि या वाढत्या स्पर्धांमुळे आणि बदलत्या आधुनिकिकरणामुळे विद्यार्थीगटाचा ताण किती वाढतो आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही.  त्यांच मानसिक खच्चिकरण केलं जातंय,  
  तरुणाईला अथवा या विद्यार्थी गटाला माध्यमाद्वारे जरी मोकळीक मिळत असली तरीसुद्धा कुठेतरी भावनिकरित्या हवी तितकी मोकळीक मिळत नाही. कुठेना कुठेतरी एक दबावगट निर्माण झालेला दिसतो. आणि मग जबरदस्ती ते प्रोजेक्टअसो वा  प्रकल्प असो त्या विषयासंदर्भात काहीही विचार न करता करून देण्यास विद्यार्थी बळी पडतात. आणि अशा वेळी विद्यार्थ्यांचं शस्त्र एकच असतं ते म्हणजे माध्यम त्यापलीकडे ते विषय शोधण्यासाठी इतर अनेक कोणतेही संदर्भ हाताळले जात नाहीत.
     पण तरीही सांगायचं झाल तर माध्यमांमुळे विद्यार्थीगटाचं प्रकल्प बनवण्याचं काम सोप झालं आहे. आणि त्या माध्यमांमुळे विद्यार्थी उत्साहाने कार्यरत राहून काम करतात.
      प्रोजेक्ट बनवण्याचे दोन प्रकार आहेत. . १) वैयक्तिक प्रोजेक्ट आणि २) ग्रूप प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या प्रकारांमध्ये अलीकडेच  पीपीटी प्रेझेंटेशनची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे. आणि विद्यार्थी गटाची मानसिकता लक्षात घेतली असता असे दिसून येते कि दिवसेंदिवस त्यांचा कल या प्रकल्प पद्धतीकडे वाढतो आहे. आणि सादरीकरण करताना ही पद्धत सोपी जाते. असं निर्देशित करण्यात आले आहे. पीपीटी प्रेझेंटेशनमुळे आपल्याला दुस-या व्यक्तिपर्यंत  माहिती पोहोचवणं सोपे जाते. तसेच योग्य माहिती सदर करण्यास मदत होते. एखादा मुद्दा जर आपण सादरीकरण करताना विसरलो तर आपल्याला पीपीटी प्रेझेंटेशनमधील मुद्दे पाहण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण आपोआप कमी होतो. आणि या  प्रेझेंटेशनचा उपयोग वैयक्तिक आणि ग्रूप अशा दोनही प्रकारांमध्ये केला जातो. माध्यमांच्या सहाय्याने सुरु झालेल्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमुळे आजच्या तरुणाईमध्ये थेट विचारशैली मांडण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आणि विचारांची देवाणघेवाण होत आहे. समाजातील विविध विषयांवर ब-याच चर्चा सुरु असतात. आणि बहुदा असे विषय प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनद्वारे असे विषय चर्चेत आणले जातात , हाताळले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मतांना त्यांच्या विचारांना सुद्धा कुठेतरी वाव मिळतो. 
      विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रकल्पांमुळे अनेक गोष्टी साध्य करता येऊ लागल्या. वाढत्या अभ्यासक्रमामुळे जरी डोक्यावर ताण येऊ लागला तरीही मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला समाजातील अनेक गोष्टी कळू लागल्या. राजकारण , समाजकारण , अर्थकारण , यातील धागेदोरे माहित पडू लागले. आणि हे विषय हाताळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत गेली. 
      संवाद साधण्याची अनेक माध्यमे आहेत कि ज्यातून आपण आपले संदेश पोहोचवू शकतो अशाच प्रकारच एक माध्यम आहे ते म्हणजे प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशन अर्थातच या प्रकल्पांद्वारे आपल्याला विशिष्ट अशी महत्वाची माहिती पोहोचवायची असल्यास किंवा प्रत्यक्षरीत्या ती व्हिडिओ अशा स्वरुपात दाखवायची असल्यास आपण तो संदेश अथवा ती माहिती शोर्ट फिल्मच्या स्त्रोताद्वारे सदर करता येतात. किंवा फोटोग्राफीच्या माध्यमातून ते छायाचित्र प्रदर्शित करता येते. आणि विध्यार्थी फिल्म्स तयार करण्यात आणि फोटोग्राफी करण्यात अतिशय तरबेज असतात आणि एक छान अभिरुची तांच्यात निर्माण झालेली असते. आणि अशा माध्यमांतून त्यांच्या विचारांना , मतांना तर मोकळीक मिळतेच पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या कलेला सुद्धा वाव मिळतो. या प्रकल्पातून त्यांना त्यांच्यातली कला सादर करण्यास वाव मिळत असताना समाजासमोर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते. 
     साधारणतः प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनचा आढावा घेतला असता हे लक्षात येत कि प्रभावशाली माध्यमांमुळे प्रकल्पांसंदर्भातील अनेक गोष्टी सध्या करता येऊ लागल्या पण अजूनही अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा हवा तितका विचार केला जात नाही आहे. मला अस वाटतं कि बदलत्या काळानुसार , बदलत्या आवडीनिवडीनुसार आणि बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणं त्यांचा ताण कसा कमी होईल याचा विचार करणं अत्यावश्यक आहे.