शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

अनुभव घेण्यासाठी इंटर्नशीपचा नवा क्रेझ………!

पंधरावी पर्यंत शिक्षण घेताना प्रत्येकजण स्वतःला घडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर मात्र त्या गाठलेल धेय्य सार्थकी लावण्याचा प्रयत्न करत असतो त्यासाठी माणूस आपल्या जगण्याचे आपल्या आयुष्याचे दोन टप्पे सतत अभ्यासत असतो , आणि चांगले वाईट क्षण अनुभवत असतो. ते म्हणजे  पंधरावी उत्तीर्ण झाल्यानंतरचा पहिला टप्पा असतो आपल्याला आपल्या जबाबदा-यांची जाणीव होणं  आणि दुसरा टप्पा असतो नोकरीचा शोध घेण………………? 
      अलीकडेच सध्या मोफत काम शिकण्याचा इंटर्नशीपचा नवा क्रेझ आला आहे. थोडक्यात सांगण्याच तात्पर्य असं कि पूर्वी असं काही नव्हतं पूर्वी उत्तीर्ण पदव्यांना प्रथम प्राधान्य देऊन थेट नोकरीसाठी त्या त्या व्यक्तीची निवड केली जायची परंतु आता काळानुसार एकंदरीत सगळ्याच पद्धतींमध्ये बदल घडून आले आहेत. शैक्षणिक स्पर्धा वाढू लागल्या आहेत. माध्यम पद्धतींमध्ये बदल घडून येत आहेत. माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे लोकांमध्ये मानवी स्वारस्य निर्माण होऊ लागले आहे. लोकांच्या मानसिकतेमध्ये बदल घडू लागले आहेत. शिक्षणपद्धातीचे स्वरूप बदलत चालले आहे. आणि बदलत्या शिक्षणपद्धतीचा इंटर्नशीपवर व्यापक प्रमाणात प्रभाव पडू लागला आहे. 
     कारण सध्या नोकरी क्षेत्रात  माध्यम तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली आहे.  त्यामुळे स्पर्धा वाढू लागल्या आहेत. आणि मागे म्हटल्याप्रमाणे पूर्वी त्यांच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना प्रथम प्राधान्य दिल जायचं पण हल्ली तुमच्या उत्तीर्ण झालेल्या पदव्यांना तितकासं प्राधान्य दिलं जात नाही. तर तुमच्या प्रायोगिक ज्ञानाला , तुमच्यातल्या आत्मविश्वासाला , कृतीला ,  क्रिएटिव्हीला , तुम्ही सतत अपडेट राहण्याला प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणि त्याकरता अनुभव घेण्यासाठी माध्यमांनी इंटर्नशीपचा नवा क्रेझ निर्माण केला आहे. कि तुमच्या शिक्षणासोबत तुमच्यातलं ज्ञान हे केवळ थिअरी पुरतंच मर्यादित न राहता ते आपल्या कृतीतून दिसावं आणि आपण सतत अपडेट राहावं. 
     इंटर्नशीप करण्याची ही पद्धती एक प्रकारे मोफत काम शिकण्याची आणि त्याहून अधिक जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्याची आपलं धेय्य सार्थकी लावण्याची पहिली पायरी आहे. एकंदरीतच इंटर्नशीप करताना आपल्याला ब-याच गोष्टी शिकायला मिळतात. उदाहरणार्थ :-  पुस्तकांचे संदर्भ , लेखनाची एक विशिष्ट शैली , भाषा , मानवी स्वारस्य , जनमत आणि लोकांची मानसिकता , वर्तमानपत्रांची माहिती थोडक्यात लेआऊट , डिझाईन , विपणन , वितरण , जाहिराती आणि वृत्तसंस्थांच महत्व , मूल्यमापन , बातमीचं अथवा त्या त्या विषयाचं गांभीर्य तसेच वर्तमानपत्राच्या पानाच आणि चौकोनातल्या बातमीच महत्त्व, लेख , अग्रलेख , संपादकीय पान , छायाचित्र , फिचर अशा खूप स-या गोष्टी इंटर्नशीपमध्ये प्रत्यक्ष काम करताना अनुभवायला मिळतात. अनेत गोष्टी जाणून घेत येतात. अनेक विषय चर्चेस येतात , समजू लागतात. विचारांची देवाण-घेवाण होते. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्यानुसार आपले मत मांडण्याला मत परिवर्तन करण्याला वाव मिळतो. प्रत्येकाला मोकळे पणाने जगता यावं याकरता माध्यम शास्त्राने तरुणाईला इंटर्नशीप नामक स्त्रोताचा नवा मार्ग खुला करून दिला आहे. 
     जेणेकरून आताच्या तरुणाईला लोकांपर्यंत त्यांच्या विचारापर्यंत आणि त्यांच्या मतांपर्यंत पोहोचता येईल तसेच इंटर्नशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांना  नोकरी शोधण्याची गरज भासणार नाही साधारणतः ६ महिने मोफत काम शिकून आपल्याला त्या कामाच्या मोबदल्यात काम केल्याच प्रमाणपत्र मिळते आणि जर आपण त्याच ठिकाणी नोकरी करण्यास इच्छुक असल्यास आपण नोकरी करू शकतो. 
      इंटर्नशिप करतानाचे आपले अनुभव खूपच निराळे असतात. उदाहरणार्थ :- पत्रकारितेत काम करत असताना शिक्षक आपल्याला नेहमी एक गोष्ट सांगत असतात कि तू पत्रकार म्हणून समाजात वावरताना तुम्हाला प्रत्येक गोष्टीची इत्यंभूत माहिती असण फार आवश्यक आहे आही हल्ली माध्यमच इतकी प्रगत झाली आहेत कि वाचन करणं हि संकाल्पनाच कुठेतरी नाहीशी होत चालली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं वाचनांच प्रमाण  खूप कमी होत चालल आहे असं दिसून येतंय. अशा काही गोष्टी ज्या आपण आपल्या आयुष्यातून वगळून टाकलेल्या असतात त्या आपल्याला या इंटर्नशीपच्या माध्यमातून उमगू लागतात.  
     त्याचप्रमाणे एकत्र काम करतानाची एक वेगळीच मज्जा सर्वांसोबत अनुभवायला मिळते. प्रत्येकाची काम करण्याची वेगळी पद्धत , एक वेगळी स्पेशालिटी जाणून घ्यायला मिळते. एकत्र काम करण्याबरोबरच वास्तवात एक नाविण्यपूर्ण आनंद लुटला येतात.  एकत्रितपणे काम करून काम करण्याची नाविण्यपूर्ण इच्छाशक्ती प्राप्त होते. स्वतःला घडवण्याची  उर्जा सतत काही न काही कौशल्य दर्शवत असते. आणि आपल्यातल्या केलेला एक वेगळी ओळख निर्माण करून देते आणि मानाचं स्थान मिळवून देणारं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष काम करताना घडत जाते. 
     इंटर्नशीप करताना आपला मानसिक , बौद्धिक , सामाजिक , आर्थिक , राजकीय  , सांस्कृतिक असे विविध टप्पे  आपल्याला समजत जातात आणि विकसित माध्यमांसोबत इंटर्नशीपला सुद्धा विद्यार्थ्यांचा एक नवा दृष्टीकोन प्राप्त झाला आणि एक प्रकारचं विकसित स्वरूप प्राप्त झालं. 

     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा