हल्ली तरुणाईच्या जीवनात प्रभावी माध्यमांच जाळ पसरत चाललं आहे. आणि एकंदरीतच या तरुणांच्या मानसिकतेवर याचा प्रचंड वेगाने परिणाम होत आहे. काळानुसार वास्तवात काय बदल घडवून आणावेत आणि काय बदल घडवून आणू नये इतपत बदल करणं सहजरित्या सोपं आणि शक्य झालं आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं कि माध्यमांद्वारे बदल घडवून आणणं जरी सोपी गोष्ट असली तरीही बदलत्या काळानुसार बदलता अभ्यासक्रम लक्षात घेता प्रकल्प बनवण्यासाठी आणि सादरीकरणासाठी तंत्रज्ञानाचा आणि प्रभावशाली माध्यमांचा उपयोग करण ही काळाची गरज झाली आहे.
खर सांगायचं तर कुठेतरी जेव्हा एका विद्यार्थी गटात आपण शिकत असतो तेव्हा डोक्यावर अभ्यासाचा बराच ताण आलेला असतो. आणि जागतिकीकरणाचा जन्म झाल्यामुळे एकंदरीतच लोकांच्या गरजा वाढू लागल्या, प्रत्येकाला आपल्या जगण्यात विशिष्ट बदल घडवून आणण्याच स्वातंत्र्य निर्माण झालं , त्याचबरोबर मानवी स्वारस्य लोकांमध्ये निर्माण होत गेलं, मग माध्यमं आली. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रातल्या स्पर्धा वाढू लागल्या माध्यमांमुळे अभ्यासक्रमात फेरबदल करण सोपं झालं त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशन या योजनांची आखणी करण्यात येऊन त्याला क्रेडीट सिस्टीमचे स्वरूप देण्यात आले. हे सांगण्याचा मूळ हेतू असा कि या वाढत्या स्पर्धांमुळे आणि बदलत्या आधुनिकिकरणामुळे विद्यार्थीगटाचा ताण किती वाढतो आहे याकडे कोणीच लक्ष देत नाही. त्यांच मानसिक खच्चिकरण केलं जातंय,
तरुणाईला अथवा या विद्यार्थी गटाला माध्यमाद्वारे जरी मोकळीक मिळत असली तरीसुद्धा कुठेतरी भावनिकरित्या हवी तितकी मोकळीक मिळत नाही. कुठेना कुठेतरी एक दबावगट निर्माण झालेला दिसतो. आणि मग जबरदस्ती ते प्रोजेक्टअसो वा प्रकल्प असो त्या विषयासंदर्भात काहीही विचार न करता करून देण्यास विद्यार्थी बळी पडतात. आणि अशा वेळी विद्यार्थ्यांचं शस्त्र एकच असतं ते म्हणजे माध्यम त्यापलीकडे ते विषय शोधण्यासाठी इतर अनेक कोणतेही संदर्भ हाताळले जात नाहीत.
पण तरीही सांगायचं झाल तर माध्यमांमुळे विद्यार्थीगटाचं प्रकल्प बनवण्याचं काम सोप झालं आहे. आणि त्या माध्यमांमुळे विद्यार्थी उत्साहाने कार्यरत राहून काम करतात.
प्रोजेक्ट बनवण्याचे दोन प्रकार आहेत. . १) वैयक्तिक प्रोजेक्ट आणि २) ग्रूप प्रोजेक्ट या प्रोजेक्टच्या प्रकारांमध्ये अलीकडेच पीपीटी प्रेझेंटेशनची नवीन पद्धत सुरु करण्यात आली आहे. आणि विद्यार्थी गटाची मानसिकता लक्षात घेतली असता असे दिसून येते कि दिवसेंदिवस त्यांचा कल या प्रकल्प पद्धतीकडे वाढतो आहे. आणि सादरीकरण करताना ही पद्धत सोपी जाते. असं निर्देशित करण्यात आले आहे. पीपीटी प्रेझेंटेशनमुळे आपल्याला दुस-या व्यक्तिपर्यंत माहिती पोहोचवणं सोपे जाते. तसेच योग्य माहिती सदर करण्यास मदत होते. एखादा मुद्दा जर आपण सादरीकरण करताना विसरलो तर आपल्याला पीपीटी प्रेझेंटेशनमधील मुद्दे पाहण्यास मदत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचा ताण आपोआप कमी होतो. आणि या प्रेझेंटेशनचा उपयोग वैयक्तिक आणि ग्रूप अशा दोनही प्रकारांमध्ये केला जातो. माध्यमांच्या सहाय्याने सुरु झालेल्या प्रोजेक्ट प्रेझेंटेशनमुळे आजच्या तरुणाईमध्ये थेट विचारशैली मांडण्याची क्षमता निर्माण झाली आहे. आणि विचारांची देवाणघेवाण होत आहे. समाजातील विविध विषयांवर ब-याच चर्चा सुरु असतात. आणि बहुदा असे विषय प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनद्वारे असे विषय चर्चेत आणले जातात , हाताळले जातात. त्यामुळे प्रत्येकाच्या मतांना त्यांच्या विचारांना सुद्धा कुठेतरी वाव मिळतो.
विद्यार्थ्यांना दिलेल्या प्रकल्पांमुळे अनेक गोष्टी साध्य करता येऊ लागल्या. वाढत्या अभ्यासक्रमामुळे जरी डोक्यावर ताण येऊ लागला तरीही मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला समाजातील अनेक गोष्टी कळू लागल्या. राजकारण , समाजकारण , अर्थकारण , यातील धागेदोरे माहित पडू लागले. आणि हे विषय हाताळल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडत गेली.
संवाद साधण्याची अनेक माध्यमे आहेत कि ज्यातून आपण आपले संदेश पोहोचवू शकतो अशाच प्रकारच एक माध्यम आहे ते म्हणजे प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशन अर्थातच या प्रकल्पांद्वारे आपल्याला विशिष्ट अशी महत्वाची माहिती पोहोचवायची असल्यास किंवा प्रत्यक्षरीत्या ती व्हिडिओ अशा स्वरुपात दाखवायची असल्यास आपण तो संदेश अथवा ती माहिती शोर्ट फिल्मच्या स्त्रोताद्वारे सदर करता येतात. किंवा फोटोग्राफीच्या माध्यमातून ते छायाचित्र प्रदर्शित करता येते. आणि विध्यार्थी फिल्म्स तयार करण्यात आणि फोटोग्राफी करण्यात अतिशय तरबेज असतात आणि एक छान अभिरुची तांच्यात निर्माण झालेली असते. आणि अशा माध्यमांतून त्यांच्या विचारांना , मतांना तर मोकळीक मिळतेच पण त्याचबरोबर त्यांच्यातल्या कलेला सुद्धा वाव मिळतो. या प्रकल्पातून त्यांना त्यांच्यातली कला सादर करण्यास वाव मिळत असताना समाजासमोर त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होते.
साधारणतः प्रोजेक्ट आणि प्रेझेंटेशनचा आढावा घेतला असता हे लक्षात येत कि प्रभावशाली माध्यमांमुळे प्रकल्पांसंदर्भातील अनेक गोष्टी सध्या करता येऊ लागल्या पण अजूनही अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा हवा तितका विचार केला जात नाही आहे. मला अस वाटतं कि बदलत्या काळानुसार , बदलत्या आवडीनिवडीनुसार आणि बदलत्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणं त्यांचा ताण कसा कमी होईल याचा विचार करणं अत्यावश्यक आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा