कला ती जी भावणारी , भासवणारी.
कला ती जी ह्या हलक्याश्या काळजाला स्पर्शून जाणारी.
कला ती जी वेदनेतून उमगणारी.
तुमच्या आमच्यात बेभान होणारी…………!
धमाल, मस्ती ह्या गोष्टी तर नेहमीच होत असतात, पण यातल्या जगण्याला मात्र एक वेगळाच वलय प्राप्त झाल होतं ते म्हणजे
कलेचं ……….!
कलेचं उमगण काय असतं याचा अनुभव मात्र कॉलेजच्या कप्प्यातच अनुभवायला मिळाला . कॉलेजचे
लेक्चर्स सकाळी ७ ला सुरु झाले कि आम्ही सगळे मस्त लेक्चर्स बसायच. आणि लेक्चर्स संपले की मग काय? आम्ही सगळे कॉलेज कट्ट्याचे राजेच ……। दिवस आणि रात्र ही केवळ आमचीच. एकमेकांना टाळ्या देत चं गप्पा मारायचो. बऱ्याच चर्चा व्हायच्या. त्यात एखादा गंभीर विषय कधी चर्चेस आला की कलेशी जोडलेली ती…। मात्र त्या विषयावर विचार करण्यातच हरवून जायची. आणि प्रश्नांना उत्तर आहे की नाही या शोधतच गुंतून जायची ?
तो कट्टा मात्र जशी जादूची छडीच……! या लेखणीची सुरुवात या कॉलेज कट्ट्यापासूनच झाली अगदी मोहक . कट्ट्यावर जाऊन बसले की अनेक कविता, लेख सुचायचे. या सुचलेल्या कविता, लेख हळूच ह्या हलक्याश्या काळजाला स्पर्शून जायचे. त्या कवितांचं आणि लेखांच सुचण हे जाणीव निर्माण करून देणारं असायचं जणू काही ह्या हलक्याश्या काळजातल पानच होत एक प्रकारे. लेख लिहिताना जशी कागदाची पानं पलटली जातात तसाच काहीसा हा कट्ट्यावरचा अनुभव. या काळजातल पानंही असंच पलटल जायचं आणि यातून अनेक विचार, संदर्भ, नवनवीन प्रश्न आपसूकच उमगायचे पण त्या कलेतली ती मात्र भावनांच्या गाभार्यात गुंतलेली अजूनही काहीतरी निसटून गेल्याचा आभास भासवणारी………?
पण पुन्हा तीच मस्ती , तीच धमाल सुरु असायची. मस्त मैफील रंगत यायची. प्रत्येकामध्ये त्या कलेचं रुजणं दिसायचं आणि कोणी बेधुंद होऊन गाण गायचं , तर कोणी शायरी म्हणायचं , तर कोणी चित्रांच्याच दुनियेत रंगांची उधळण करताना दिसायचं.
कॉलेजमधल जगणं म्हणजे मनसोक्त आनंद घ्यायचा, नवनवीन मित्र-मैत्रिणी करायचे. त्या मैत्रीतल जगणं अनुभवायचं, लेक्चर्स बंक मारायचे ., प्रोजेक्ट बनवताना विचारांची देवाण-घेवाण करायची , एकमेकांचे प्रोजेक्ट्स कॉपी पेस्ट मारायचे आणि असे मजेदार अनुभव घ्यायचे . चर्चा करण तर नेहमीच सुरु असायचं आणि जबाबदारीच्या जाणिवांच्या गोष्टी कॉलेजच्या जगण्यातून अनुभवायला मिळाल्या. मूळातच अनुभवांशी आणि आठवणींशी जोडलेलं नातं काय असतं हा प्रश मात्र शेवटपर्यंत हे काळीजच कोरत होतं .
त्या कलेतली ती मात्र अजूनही तशीच होती काहीतरी शोधत असणारी …………? त्या कलेच्या साठवणीत बेभान होणारी. कॉलेजच्या कट्ट्यावर लेखन करण्याची मजाच काहीशी निराळी असायची. आणि अजूनही त्या आठवणीत जगताना मात्र कॉलेज कट्ट्याच स्मरण केल्याशिवाय लेखनाला सुरुवात होत नसे. मुळातच तो कट्टा अगदीच जिव्हाळ्याचा विषय झाला होता. त्या कलेतली ती आणि कट्ट्याच्या छायेत एक जाणतेपणाच नातं निर्माण झाल होतं. ह्या जगण्यातल जगणं काय असतं हे मात्र या कट्ट्यानेच तिला शिकवलं होतं. तिच्यातल्या अनुभवाची पहिली पायरी चढायला शिकवलं होतं या कॉलेज कट्ट्याने. हे कॉलेजचं वेगळ जगणं अनुभवताना हे काळीज बेभान होऊन गेलेलं असायचं. दिवस कधी मावळून जायचा कळायचच नाही. पण दिवसाची सुरुवात अगदी रसाळ आणि मावळती रात्र काहीतरी भासवणारी अगदी शांत , ही भयान शांतता सुद्धा तिच्यात हरवून जाणारी असायची.
खर तर प्रत्येकासाठी कॉलेज म्हणजे एक वेगळ जगणं तर आहेच. प्रत्येकाच्या जगण्यात धमाल , मस्ती या गोष्टी होताच असतात ; पण त्याव्यतिरिक्त सुद्धा प्रत्येकजण काहीना काही शिकत असतो, अनुभवत असतो आणि आपल्या गोष्टी एकमेकांमध्ये शेअर करत असतो. तसंच काहीसं तिचं जगणं होतं आठवणी जपणं, कॉलेज कट्ट्यासोबत आपल्या गोष्टी शेअर करणं, छान कविता लिहिण्याचा आनंद लुटणं पण तरीही तिच्यातलं जगणं मात्र जरा वेगळंच होतं.
हव्या नको त्या सगळ्या गोष्टी या आठवणीत सामावून जायच्या. आणि कट्यावर बसून कविता करण्याची मजाच काही निराळी असायची. मनात आलेले विचार कागदार उतरवताना त्याला कधी कवितांच स्वरूप प्राप्त व्हायचं काही कळायचं नाही. तिच्या मनातले बोल कोऱ्या कागदावर उतरवण्याच तिला फार वेड असे त्यामुळे त्या कामात ती नेहमीच उत्सुक असायची. आणि त्यामुळे तिचा मनाचा ठाम निश्चय असायचा कि या कट्ट्याच्या सानिध्यात माझ्या काळजावर कोरलेल्या, जपलेल्या आठवणी अनुभव कोऱ्या कागदावर उतरवायच्या आहेत. कालांतराने मग कविता करण्याची आवडही निर्माण झाली. हवं तसं, हवं तेव्हा मोकळेपणाने व्यक्त होण्याच्या नव्या जगण्याला येथून सुरुवात झाली.
स्वतःला घडवण्याचा आत्मविश्वास या लेखणीने आणि नात्यातल्या जाणतेपणाने तिच्यातल्या कलेला मिळवून दिला आहे.
स्वतःला घडवण्याचा आत्मविश्वास या लेखणीने आणि नात्यातल्या जाणतेपणाने तिच्यातल्या कलेला मिळवून दिला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा