शेखर सोनाळकर :- छात्र युवा संघर्ष वाहिनी .
माझ्या जीवनातली नव्याने अनुभव घेणारी ही पहिलीच मुलाखत, मनात तर प्रचंड भय होतं पण करायचं काय मुलाखत तर घ्यावी लागणारच प्रश्नांपेक्षा मनात भीतीनेच घर करून ठेवल होतं पण विषय अगदीच सोपा आणि हलका आणि मला झेपेल इतका साजेसा होता. पण मनात तर अजून एक भीती होती की मुलाखत देणारे कलीग कसे असतील, ते मला चांगला प्रतिसाद देतील न?, आणि मी इतक्या मोठ्या व्यक्तीशी कस बोलणार आहे बापरे अगदीच घामाने डबडबून गेले होते., मी त्यांना योग्य प्रश्न विचारू शकेल ना? माझ अज्ञान तर त्यांना दिसणार नाही न? असं प्रश्नाचं चक्र बराच वेळ सुरु होतं पण मनाची तयारी तर करावी लागणार होतीच आणि यापलीकडे विचार करण्यासाठी तितकासा वेळ सुद्धा नव्हता, अलीकडे थोड्या वेळातच मुलाखत सुरु होणार होती मनात भीती तर होतीच पण आईने मात्र मला माझा गमावलेला आत्मविश्वास मिळवून दिला होता. मुलाखत सुरु झाली, शेखर सोनाळकरजी आणि मी समोरासमोर बसलो आमची तोंडओळख झाली आणि आमच्या संवादाला सुरुवात झाली. मी त्यांना प्रश्न विचारला कि सर सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड असणे आवश्यक आहे का ?…………………… ते जे सुरु झाले कि मला त्यांना पुढचा प्रश विचारण्याची संधीच त्यांनी मला दिली नाही त्या एका प्रश्नातच त्यांनी ही मुलाखत परिपूर्ण केली. तर आपण या मुलाखतीमधून त्यांच्या प्रतिक्रिया थोडक्यात जाणून घेणार आहोत त्या पुढीलप्रमाणे :-
ड्रेसकोडचा पहिला उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये फरक करता येऊ नये. दुसरा उद्देश श्रीमंत गरीब वर्गामध्ये फरक करता येऊ नये. , तिसरा उद्देश वेगवेगळ्या जाती धर्माची व्यक्ती वेगळी वेगळी ओळखता येऊ नये. , आणि चौथा उद्देश म्हणजे शिक्षकांची सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी समत्वाची असावी. कोण श्रीमंत आहे , कोण गरीब आहे , कोणाची आर्थिक परिस्थिती कशी आहे , कोण हिंदू आहे , कोण मुसलमान आहे असे भेदभाव करता येऊ नयेत. त्यामुळे शिक्षकांची त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी समत्वाची असावी.
महाविद्यालयांना ड्रेसकोड कंपल्सरी केल्याने सध्या होणार आहे का ? त्यांचा ड्रेस महाविद्यालय देणार आहे का ? की काळी पेन्ट आणि पंधरा शर्ट असं म्हटल्यानंतर अगदी ५० रुपयांपासून ते ५,००० पर्यंतचे पीस येतात त्याच्यातपण पांढरा शर्त अतिशय स्वस्तात्पासून कमालीच्या महागपर्यंत येतो आणि त्यात त्यात ड्रेसकडे पाहिल्यानंतर ते लक्षातही येते याचा दर्जा काय आहे ते……! जर का असं होणार असेल तर त्या ड्रेसकोडचा उद्देशच काय सफल होणार ?
ड्रेसकोडचा आणखी एक उद्देश म्हणजे नीती स्तलावणे. साधारणतः विद्यार्थ्यांना थोडं मोकळ सोडणं आवश्यक असतं , त्यांच लहानपण संपलेलं आहे आता त्यांना स्वयंशिस्त अंगात आण अशी आशा असावी. आता त्यांना शिस्त लावण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना स्वयंशिस्त आणि थोडी मोकळीक असावी म्हणून महाविद्यालयालयामध्ये अजून ड्रेसकोड आलेला नाही. ; आता जे लोक असं म्हणतात की ड्रेसकोड लावावा त्यांना नेमकं काय हवाय , म्हणजे नेमकं ड्रेसकोड मागचं शास्त्रीय कारण काय ? कशासाठी हवाय ड्रेसकोड ? आणि ड्रेसकोड हवा असेलच तर तो केवळ विद्यार्थ्यांनाच का ? शिक्षकांना का नको ; शिक्षकांना सुद्धा पाहिल्यानंतर टिकली
ड्रेसकोडचा आणखी एक उद्देश म्हणजे नीती स्तलावणे. साधारणतः विद्यार्थ्यांना थोडं मोकळ सोडणं आवश्यक असतं , त्यांच लहानपण संपलेलं आहे आता त्यांना स्वयंशिस्त अंगात आण अशी आशा असावी. आता त्यांना शिस्त लावण्याची गरज नाही. आणि म्हणून त्यांना स्वयंशिस्त आणि थोडी मोकळीक असावी म्हणून महाविद्यालयालयामध्ये अजून ड्रेसकोड आलेला नाही. ; आता जे लोक असं म्हणतात की ड्रेसकोड लावावा त्यांना नेमकं काय हवाय , म्हणजे नेमकं ड्रेसकोड मागचं शास्त्रीय कारण काय ? कशासाठी हवाय ड्रेसकोड ? आणि ड्रेसकोड हवा असेलच तर तो केवळ विद्यार्थ्यांनाच का ? शिक्षकांना का नको ; शिक्षकांना सुद्धा पाहिल्यानंतर टिकली
लावणा-या , भांग पाडणा-या महिला पाहिल्यानंतर स्त्रिया हिंदू आहे हे लक्षात येतं मग शिक्षकांना सुद्धा कोण हिंदू - मुसलमान हे लक्षात यायला नको. विद्यार्थ्यांना सगळे शिक्षक सारखे असायला पाहिजेत. असं जर हवं असेल तर शिक्षकांना का ड्रेसकोड नको , प्राचार्यांना का नको ? आणि मग ड्रेसकोड यातनं काय साध्य होतं. विद्यार्थ्यांना काही मोकळीक मिळत नसेल मग ड्रेसकोचा हट्ट कशासाठी ? त्यामुळे ड्रेसकोड नसावा आणि ज्यांना ड्रेसकोड आणायचाच असेल त्यांनी यामागचं लॉजिक सांगावं.
जे अस म्हणतायत त्यांना ते मुलींवर बंधनं आणण्याकरता ड्रेसकोड ठेवायचा आहे मुलांकरता काही त्यांना ड्रेसकोड नकोय. म्हणजे आजच्या मुली जर अधिक मोकळे कपडे घालतात , अगदी स्पष्ट सांगायचं तर त्यांचे अवयव दिसतात जे दिसू नये असं जे संस्कृतिरक्षकांना वाटतंय त्यांना असं वाटतंय कि ड्रेसकोड असावा. तुम्ही ड्रेसकोड ठेवला तर मला सांगा तुम्ही पंजाबी ड्रेस आणि सलवार घालणं काय हो ? आणि जर आपण मुलींकरता ड्रेसकोड शर्ट pant ठेवला तर त्यातनं ज्याला बघायचं त्याला दिसतं , ज्याला दाखवायचं आहे त्याला दाखवता येतं म्हणजे ह्यातून संकृतीराक्षाकांचे हेतू साध्य होत नाहीत. आणि हे बंधनाच्या दृष्टीकोनातून जरा गंभीरच आहे. आणि मुळात तरुणवर्गाची मानसिकता बदलणार नाही…………!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा