शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

आयव्ही नावाची सहल…………………………. !

खरं तर आयव्ही म्हणजे काय हेच माहित नसे. आयव्ही या शब्दाची ओळख मात्र तेरावीला असताना झाली. मला तर अगदी बारावीपर्यंत सहल इतकच माहित होतं. आणि सहल म्हणजे मज्जा करणं इतकीच मानसिकता तयार झालेली असायची. पण म्हणतात नं कि आपण जसजसे मोठे होत जातो तसतसे आपले विचार बदलत जातात आणि आपल्या करीयरची सुरुवात ज्ञानापासून होत असते आणि त्या ज्ञाना गांभीर्य आपल्याला समजते. 
     हि आयव्ही नावाची सहल आपल्याला कळत नकळत बरेच काही अनुभव देऊन जातात आणि तेच क्षण मी अनुभवले आहेत. आयव्हीला जायचं म्हणजे ग्रूपशिवाय मज्जाच नाही. धमाल , मस्ती , चर्चा , सेटिंग या सगळ्याच गोष्टींसाठी ग्रुप हा हवा असतोच त्याशिवाय आयव्ही तरी परिपूर्ण कशी होऊ शकेल ? असोत पण आयव्ही नामक सहल ही केवळ मज्जा नाही तर हे एक अभ्यासाचं माध्यम आहे. सुरुवातीला मलासुद्धा हे समजल्यावर आश्चर्य वाटलं होतं पण खरच कधी कल्पनाच केली न्हवती कि आयव्ही हे एक इतक प्रभावशाली माध्यम असेल म्हणून. 
     म्हणजे आता बघा न मी १४ वी ला असताना आमची आयव्ही केरळला गेली होती. निसर्गाचा तेजोमयपणा , त्या निसर्गाचं सौंदर्य , आणि पर्यावरणाची काळजी घेणारी तेथील माणसं गेली कित्येक वर्ष यांनी तो जिव्हाळा जपला आहे, त्या निसर्गाच्या भावना जाणल्या आहेत. आणि केरळच मुख्य वैशिष्ट्य हे आहे कि तेथील सरकारला सुद्धा आपल्या राज्याची आणि मुख्यत्वे पर्यावरणाची पुरेपूर जाणीव आहे.  या निसर्गसौंदर्याने केरळची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अभिमान वाटतो कि तेथील सरकार आपल्या जबाबदा-या लक्षपूर्वक पार पाडते आणि खंत एकाच गोष्टीची वाटते की भारतात तर गेली कित्येक वर्ष पर्यावरणाच भान हरपलंय पर्यावरणाची उणीवही कोणाला भासत नाही आणि प्रदूषण अथवा आरोग्यासंदर्भात कोणत्याही समस्या निर्माण झाल्या तरीही सरकार शांतच………? हे किती घृणास्पद आहे म्हजे थोडीही लाज नसावी…………? 
     हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे कि हल्लीच्या तरुणाईला या गोष्टी जाणून घेण्यात बराच रस असतो आणि जेव्हा आयव्ही सारख्या माध्यामातून आपल्याला  अशा गोष्टींची माहिती मिळत जाते तसतशी आपल्या ज्ञानात वाढ होत जाते आपल्याला जबाबदा-यांची जाणीव होते आणि आपण अनेक विषयांवर चर्चा करू लागतो , विचार करू लागतो, त्या त्या गोष्टीचं गांभीर्य आपल्याला कळू लागतं. 
     साधारणतः आपण जेव्हा आयव्हीला फिरायला जातो तेव्हा त्या कालावधीत आपल्यामध्ये एक जाणतं आणि आपुलकीचं नातं काळत नकळत कधी निर्माण होत जात हे आपल आपल्यालाच ठाऊक नसतं. आणि एखाद्या ठिकाणी फिरताना आपल्याला त्या ठिकाणची संस्कृती , भाषा , खाद्यपदार्थ , त्यांची समाजात वावरण्याची एक पद्धती , तेथील ऎतिहासिक बांधकामाची माहिती मग त्यातही त्या शेकडो वर्षापूर्वीच्या बांधकामासाठी वापरलेले शिल्पं आणि शिल्पकार , त्या कालावधीत झालेली युद्ध अशी खूप सारी माहिती आपल्याला या आयव्ही नामक माध्यमातून जाणून घेता येते. 
उदाहरणार्थ :- केरळमध्ये धार्मिक संकृतीचा तेथील लोकांवर व्यापक प्रमाणात प्रभाव आहे. तसेच केरळमध्ये संकृतीला पाहिलं प्राधान्य दिलं जातं. आणि निसर्गावर प्रेम करणं हे तेथील लोकांचे मुख्य वैशिष्ट्य आहे. 
     ही माहिती मला आयव्हीच्या माध्यमातून मिळाली. आणि तेव्हा अभ्यास करण्याचं नवं माध्यम मला मिळालं येथपासून अनुभवांची शिदोरी माझ्या हाती लागली. प्रगतशील माध्यमातून प्रगतशील विचारांची देवाणघेवाण सुरु झाली. अगदी कुठेही फिरायला गेल्यानंतर तो विषय कधी त्या मनाच्या हळव्या कप्प्यात दडून जातो हे माझं मलाच कळत नसे.
    साठवणीच्या गाभा-यात आयव्ही हा विषय अगदीच जिव्हाळ्याचा विषय झाल्यापासून कुठेतरी असं जाणवू लागलं कि जगणं हे कधीच भावनांपर्यंत थांबत नसतं त्या भावना व्यक्त कारणासाठी या सहलीतून मला मोकळीक मिळत गेली. क्षणोक्षणी काही ना काही अनुभवणारं , भासवणारं , काळजाला स्पर्शून जाणारं , व्यक्त होणारं , भावणारं असं जगण्यातलं जगणं मला केवळ आठवणीनेच जपता आलं 
     फिरण्यातंन तर भरपूर आठवणी जपता आल्या , आणि आनंदाने व्यक्तही होता आलं पण खरी मज्जा तर ग्रुपमध्ये होती. ग्रुपमध्ये चर्चा करताना गॉसीप नावाचं माध्यम लागायचं ते गॉसिप अगदी ट्रेनमधील प्रवासापासून सुरु झालेलं असायचं आणि तरुणाईच्या चर्चा म्हणजे भाषेच्या प्रभावापासून परिणाम दर्शवण्यास सुरुवात व्हायची त्या तरुणाईच्या प्रभावी भाषेमध्ये शिक्षकांचाही सहभाग असायचा आणि या प्रवासात एकंदरीतच भाषेच्या माध्यमापासून होणारी सुरुवात हळूहळू सगळ्या माध्यमांच्या खोलात शिरायची. म्हणजे संवाद , विचारांची देवाण-घेवाण , फोटोग्राफी , विविध पुस्तकांचे संदर्भ , कविता अथवा शेरोशायरीची मैफिल आणि त्यातून होणारे हस्यविनोद सुद्धा कळत नकळत काही ना काही संदेश पोहोचवत असे.   
     प्रत्येकजण स्वतःच्या कलेची ओळख करून देताना त्या कलेला माध्यमाच स्वरूप प्राप्त झालं मात्र ज्ञान आणि जगणं या दोन्ही गोष्टींना आयव्ही नामक सहलीच्या माध्यमातून वाव मिळत गेला. त्याचप्रमाणे  तरुणाईला वेगवेगळे विषय मिळत गेले. आणि तरुणांमध्ये हळूहळू एक व्यापक दृष्टीकोण निर्माण होऊ लागला. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा