बुधवार, २९ ऑक्टोबर, २०१४

माझं स्टेटस हीच माझी ओळख ……………!

     हल्ली स्वतःची एक नाविण्यपूर्ण ओळख बनवण्यासाठी स्टेटसचा चांगलाच ट्रेंड आला आहे. आणि ही ओळख प्रसारमाध्यमांमुळे निर्माण झाली आहे. आनंद , दुःख , साठवणी , भावना या सगळ्या गोष्टी आपल्या स्टेटसमध्ये सामावून जातात. आणि त्या आपण माध्यमांद्वारे व्यक्त करत असतो. आपल्याला  त्या व्यक्त करायच्या नसतात पण त्या माध्यामप्रभावी  व्यक्त होत जातात. 
उदाहरणार्थ :- whatsup आपण या संवादाच्या माध्यमातून केवळ चर्चाच करत नाही तर आपण आपली ओळख दाखवण्याकरता , निर्माण करण्याकरता छान फोटो अर्थात whatsup dp म्हणून ठेवतो. , त्याचप्रमाणे प्रत्येक बदलत्या वेळेनुसार , दिवसानुसार , वातावरणानुसार  , आणि आपल्या उत्साहानुसार-मानसिकतेनुसार आपण आपले स्टेटस ठेवत असतो आणि सतत बदलत असतो त्यालाच एक प्रकारे माध्यमांद्वारे व्यक्त होणे अस म्हणतात. 
     खर तर एक स्मायली सिम्बॉल सुद्धा आपल्या भावनांना मोकळीक देत असते. तसं म्हणायचं झाल तर हल्ली नात्यातला गोडवा सुद्धा माध्यमातून व्यक्त करता येऊ लागला आहे. उदाहरणार्थ :- मामा , काका , दादा , ताई कोणीही नातेवाईक असोत कोणाचा वाढदिवस असो, व कोणाच्या प्रमोशनची बातमी असोत पार्टी स्टेटस सुद्धा झळकावणं शक्य झालंय. हे नातं भावतं कि नाही हे तर माहीत  नाही पण कुठेतरी एक जिव्हाळा व्यक्त करता येतो हे मात्र खर …… ! 
     स्वतःची ओळख निर्माण करणारं  स्टेटस आपल्याला आपल्या ओळखीपर्यंतच मर्यादित ठेवत नाही तर आपल्या मानसिकतेमध्ये आपल्या विचारांमध्ये सुद्धा बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो थोडक्यात आपल्यामध्ये आपसूकच  एक प्रकारचा इगो , अतिआत्मविश्वास निर्माण होत जातो. आणि आपल्या वागण्या - बोलण्यात सुद्धा अधिक प्रमाणात फेरबदल झालेला दिसतो, हा आपल्यामध्ये झालेला बदल बरेचदा स्वतःला दिसून येत नाही पण आपले आई-बाबा , शेजारी वा मित्र-मैत्रीणीना दिसून येतात. आपल्या राहणीमानाला एक वेगळा लूक येतो. आपल्या भाषेत , आपल्या खानपानात बदल, वेशभूषा , केशभूषा , असे अनेक बदल आपल्यामध्ये घडून येताना दिसतात. उदाहरणार्थ : - आपल्या बोलीभाषेला glamarar शब्दांच स्वरूप प्राप्त झालं आहे. थोडक्यात hiiiiiii - hello ,  wts up . त्याचप्रमाणे खानपानाच्या पद्धतीत बदल झाले थोडक्यात स्वतंत्रपूर्व काळापासून भारतामध्ये वरण-भात , भाजी-पोळी असे मोजकेच आणि मर्यादित खाद्यपदार्थ माहित होते पण आता २१ व्या शतकात तस राहिलेलं नाही. प्रसारमाध्यमांमुळे अनेक खाद्यपदार्थांना सुद्धा ओळख निर्माण झाली. नवनवीन पदार्थ म्हणजे पिझ्झा, बर्गर, चायनीज अशा फास्ट फूड , जंक फूड अशा खाद्यपदार्थांची ओळख निर्माण झाली आणि ती ओळख तेवढ्यापुरतीच मर्यादित न राहता त्या पदार्थांना प्रसिद्धीबरोबरच लोकांच्या राहणीमानास अनुसरून एक नवं लाइफस्टाईल प्राप्त झाल आहे त्यामुळे मानवी स्वारस्याला चालना मिळत आहे. 
      तसेच पेयांमध्ये सुद्धा जूस, कोल्ड्रिंक्स त्यामध्ये पण कोक , पेप्सी , सोडा , मिरिंडा अशे बरेच प्रकार असतात त्यातही विविध प्रकारचे रंग , फ्लेवर असतात आणि हल्लीच्या तरुण पिढीसाठी ह्या पेयांच सुद्धा नवीनच फॅड आल आहे. हे सांगण्याच तात्पर्य असं या कोल्ड्रिंक्सवरुनसुद्धा आपले स्टेटस ठरतात. आणि त्या बदलत्या स्टेटसनुसार आपली मानसिकताही तेवढ्याच जलद गतीने बदलत जाते ती बदलण्यास माध्यमं प्रोत्साहन देत असतात.  
     साधारणतः सध्या त्यामानाने पूर्वी आपल्या भावना मनाच्या हळव्या कप्प्यातच व्यक्त कराव्या लागायच्या पण आता प्रसारमाध्यमांमुळे मानवाच्या अनेक अडचणी दूर झाल्या आहेत आणि पूर्वी तर आणि पत्र पाठवण्यापलीकडे दुसरा माहितीचा काहीच सोर्स नव्हता. पण आता तसं राहिलेलं नाही १९९१ मध्ये जागतिकीकरणाचा उदय झाल्यामुळे अनेक सोयी उपलब्ध झाल्या माध्यम तंत्रज्ञानाला चालना मिळाली , समाजामध्ये मानवी स्वारस्य निर्माण झालं आणि नवनवीन गोष्टींचं फॅड निर्माण होऊ लागलं. माध्यमांद्वारे व्यक्त होता येऊ लागलं. , मोकळीक मिळू लागली , विचारांची देवाण-घेवाण होऊ लागली , आणि मानवी स्वारस्यानुरूप स्टेटस ची ओळख निर्माण झाली.  
      त्याचप्रमाणे comment , प्रतिक्रिया , सिम्बॉल , मेसेंजर सारख्या अनेक सोर्समुळे आपल्या स्टेटसला एक नाविन्यपूर्ण रचना प्राप्त झाली. या सोर्सद्वारे आपल्याला आपली मत व्यक्त करता येऊ लागली , आपल्यामध्ये मतपरिवर्तन होऊ लागलं त्या त्या स्टेटसनुसार त्या त्या वातावरणानुसार आपण कशा प्रकारे व्यक्त व्हावं हे स्टेटसच्या फॅडमुळेच लक्षात येऊ लागलं. तेहापासून फॅशनचं नवं युग सुरु झालं. 
     तसं पाहायला गेलं तर माध्यमांमुळे सध्या भावना व्यक्त करण्याला मर्यादा आलेल्या नसल्या तरीही नाती जपण्याला आणि जवळीक साधण्याला मात्र नक्कीच आर्यादा आलेल्या आहेत. कारण स्टेटसने आपण आपली ओळख निर्माण करू शकतो , मनमोकळेपणाने व्यक्त होऊ शकतो पण तरीही माध्यमांनी जपलेला जिव्हाळा आणि जगण्यातला जिव्हाळा जपण्यात मात्र खूप फरक असतो. थोडक्यात जवळच्या नात्यांपुढे दुरावा असणारी नाती हे केवळ माध्यमांसारखीच आपण चालवू तशीच चालतात. स्टेटसचं हे फॅड केवळ एक मनोरंजनच साधन आहे. तेवढ्यापुरता सुगावा , समाधान देण्याचं काम स्टेटस करत असंत. 
      या जगण्यातून आपल्याला स्टेटस ठेवण्यासाठी अनेक विषय सुचत जातात , मिळत जातात आणि त्यातून आपली एक वेगळी ओळख निर्माण होते. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा